Yawatmal Crime: कळंबमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक; पोलिसांची मोठी कारवाई!

Marathi Latest Crime News : बालाजी छगन काळे यांचे शेत सर्व्हे नंबर ६७४ च्या लगत आसलेल्या रोडवर चौघेजण दिसून आले
 कळंबमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक!
Yawatmal Crime:sakal

Kalamba Crime: गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. शनिवार (ता. सहा) रात्री पवनेनाऊ च्या सुमारास मनुष्यबळ पाटीवर कळंब येरमाळा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे. संशयितांकडून गांजासह १ दुचाकीसह असा एकूण १० लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या तस्करी प्रकरणातील तिघे संशयित पोलिस पथकाला गुंगारा देवून फरार झाले आहेत.सौरभ संजय काळे (वय -२४) रा इंदिरानगर कळंब असे अटक कऱण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

 कळंबमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक!
Nagpur Cyber Crime : कधी शेअर तर कधी टास्कचे आमिष; दररोज वीस जणांची सायबर फसवणूक

पोलिसांनी सांगितले की,धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हेह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व अवैध धद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना,कळंब येरमाळा रस्त्यावर मनुष्यबळ पाटीजवळ पोलिस पथक आले असता,चौघे जण मोटर सायकलवर पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांज्या घेवून तालुक्यातील मोहा रस्त्याने मनुष्यबळ पाटीकडे येणार आहे. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकासह कळंब पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, तांबडे, पोपट जाधव, शेख, तारळकर फॉरेसीक व्हॅन व दोन पंचासह शनिवारी पावणे नऊ च्या नऊच्या दरम्यान दाखल झाले.मोहा रस्त्यावरील बालाजी छगन काळे यांचे शेत सर्व्हे नंबर ६७४ च्या लगत आसलेल्या रोडवर चौघेजण दिसून आले.

त्यापैकी दोघे स्कुटीवर व दोघे हे बुलेटवर येत असताना पथकास दिसले.त्यांना हात करुन थांबण्याचा प्रयत्न केला असता, ते तेथुन पळून जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी दोघा जणांना पकडले. बुलेट वरील दोनजण त्यांच्या ताब्यातील बुलेट व भरलेले पोते जागीच रस्त्यावर टाकून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. सुक्टीवरील पकडलेल्या एकाला पोलिसांनी पकडुन त्याची माहिती घेतली असता, सौरभ संजय काळे, वय २४ वर्षे, रा. इंदीरानगर कळंब याने पोत्यमध्ये गांजा असल्याचे सांगितले.गांजा हा बालाजी छगन काळे, संजय राजेंद्र उर्फ दादा काळे रा. मस्सा (खं) ता. कळंब यांचे कडून विकत घेतला असुन तो आम्ही जामखेड जि. अहमदनगर येथे विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचे सागिंतले.

 कळंबमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक!
Nagpur Crime : पोलिसांना डांबून बालसुधारगृहातून तिघीजणी पळाल्या; वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर धक्कादायक सत्य आलं समोर

संशयिताच्या ताब्यातून पोत्यामध्ये एकुण २० पाकीटात ४० किलो २६० ग्रॅम वजनाचा एकुण ८ लाख ५ हजार २०१ किंमतीचा गांजा दुचाकीसह असा एकुण १० लाख २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी कळंब पोलिसात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २०(ब), २०(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक्क पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, कळंबचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, हुसेन सय्यद, अश्विन जाधव, प्रदिप वाघमारे, शोभा बांगर, नितीन जाधवर, बबन जाधवर, योगेश कोळी,महेबुब अरब, संतोष लाटे, प्रशांत किवंडे,तांबडे, जाधव, शेख, तारळकर यांच्या पथकाने केली आहे

 कळंबमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक!
Dhule Crime News : घरफोडी करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना अटक; पोलिसांची शास्त्री कॉलनीतील चोरीप्रकरणी कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com