कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी

One died in an accident at Gadchiroli
One died in an accident at Gadchiroli

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरीवरून आष्टीकडे जाणाऱ्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना शनिवारी (ता. 13) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. 

प्राप्त माहितीनुसार, अहेरी येथील श्‍यामराव गुंडावार आपल्या भाच्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात तपासणीसाठी कारने घेऊन जात होते. कार आणि आष्टीकडून आलापल्लीकडे येणाऱ्या ट्रकची लगाम चेक या गावाजवळील हनुमान मंदिरासमोरच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. यात गुंडावार यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक सुधीर दासरवार व गुंडावार यांचा भाचा मोहनीश एग्लोपवार जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जखमींना बाहेर काढत असताना एकाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे इतर दोघांना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी अहेरी येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुंडावार यांचा मृतदेह वाहनातून बाहेर काढला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com