रोजीरोटी देणाऱ्या ट्रकने सहा महिन्यात दोनदा केला एकाच कुटुंबाचा घात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

रविवारी सकाळी सात वाजता नागपूर-तुळजापूर महामार्गावर असलेल्या आर्णीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या कोसदणी घाटातील वळणावर पलटी झाला. त्यामुळे ट्रकचा चुराडा झाला. तर ट्रक चालक दत्ता राठोड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

आर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर महामार्गावर आर्णीवरून पंधरा किमी अंतरावर असलेल्या कोसदणी घाटात दगडी कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर कोळसा मालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. एक) सकाळी सात वाजता कोसदणी घाटात घडली. दत्ता राठोड (35, रा. आमणी, ता. महागाव) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. 

महागाव येथील संदीप गांवडे यांच्या मालकीचा एमएच 26 एच 6585 क्रमांकाचा ट्रक चंद्रपूरवरून दगडी कोळसा घेऊन अंबोडा ता. महागाव येथे जात होता. रविवारी सकाळी सात वाजता नागपूर-तुळजापूर महामार्गावर असलेल्या आर्णीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या कोसदणी घाटातील वळणावर पलटी झाला. त्यामुळे ट्रकचा चुराडा झाला. तर ट्रक चालक दत्ता राठोड याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

हेही वाचा - सतरा वर्षाच्या प्रियकराने प्रेयसीसाठी गाठले छत्तीसगढ, मध्यप्रदेश अन्‌ केले हे...

सोबत असलेले कोळसा मालक विठ्ठल देवरकर (56, रा. अंबोडा, ता. महागाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना हायवे पोलिसांनी लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. कोसदणी घाटात नेहमीच अपघात होत असल्याने हे स्थळ अपघाताचे प्रणवस्थळ झाले आहे. कोसदणी लगत असलेले महामार्ग पोलिस सतर्क रहात असून, अपघात ग्रस्थांना तातडीने मदत करताना दिसून येते. 

सहा महिन्यांपूर्वी भावाचा मृत्यू

ट्रक चालक दत्ता राठोड हे तीन भाऊ असून, तिघेही ट्रक चालवतात. ते आमनी येथील रहिवाशी आहे. रविवारी झालेल्या अपघातात दत्ताचा मृत्यू झाला तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात एका भावाला जीव गमवावा लागला होता. सह महिन्याच्या अंतरात दोन भावांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies in truck accident at Yavatmal