सतरा वर्षाच्या प्रियकराने प्रेयसीसाठी गाठले छत्तीसगढ, मध्यप्रदेश अन्‌ केले हे...

सतरा वर्षाच्या प्रियकराने प्रेयसीसाठी गाठले छत्तीसगढ, मध्यप्रदेश अन्‌ केले हे...

नागपूर  : प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी प्रियकर काय करू शकतो, याचा नेम नाही. प्रेमात आकंठ बुडालेल्या 17 वर्षाच्या प्रियकराने प्रेयसीचा खर्च भागवता यावा, यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्‍क शंभरपेक्षा जास्त चोऱ्या, घरफोड्या केल्या आहेत. त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशसह तब्बल चार राज्यांत चोऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला वाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आतापर्यंत 50 ते 60 चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. राजू (काल्पनिक नाव) असे या चोरट्याचे नाव असून तो वाडी परिसरात राहतो.

अजब प्रेम की गजब कहानी
20 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री प्रवीणने दत्तवाडी येथील शुभारंभ सोसायटी येथील हनुमान मंदिरात चोरी केली होती. मंदिरातील दानपेटी आणि रोख 15 हजार रुपये त्याने चोरले होते. याप्रकरणी केशव बांदरे (50) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, गुन्हा नोंदवून तीन महिने झाले तरी आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी आयसीजेएसच्या माध्यमातून गुन्हेगाराचा शोध सुरू केला. त्यात वाडी परिसरातील गुन्हेगारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यात राजूचादेखील समावेश होता. पोलिसांनी राजूची कसून चौकशी केली असता त्याने शुभारंभ सोसायटी येथील हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, नरसिंगपूर (म.प्र.) येथे त्याची 22 वर्षीय प्रेयसी आहे. प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी तो चोऱ्या करीत असे. महिन्याभरापूर्वी त्याने त्याच्या प्रेयसीला धमकी देत तिला मारहाण केली होती. त्याचप्रमाणे मामाच्या मदतीने त्याने प्रेयसीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, गावकऱ्यांनी त्याला अडवून बेदम चोप दिला होता. एक महिना तो कारागृहात होता.

नागपुरातील "त्याचे' प्रताप
चोरी करताना तो एकटाच चोरी करीत असे. कुणालाही सोबत घेत नसे. तर कधी नवख्या व्यक्‍तीला पार्टनरशिपचे आमिष दाखवून सोबत नेत असे. नागपुरातून महागड्या दुचाकी चोरून तो मध्य प्रदेशात विक्री करीत असे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी त्याने डिफेन्स आठवडी बाजार येथून एमएच 40 एएस 9155 क्रमांकाची ऍक्‍टीवा दुचाकी चोरली होती. काही दिवस चोरीची दुचाकी वापरल्यानंतर त्याने ती दुचाकी त्रिमूर्तीनगर येथील भगवती हॉलमागे बेवारस अवस्थेत सोडून दिली होती असेही त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com