चंद्रपुरात शिकार? दोन अस्वल आणि एक बिबट आढळले मृतावस्थेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

काच वेळी तिघांचाही मृत्यू झाल्याने हा शिकारीचा प्रकार असावा आणि विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून ही शिकार केली असावी अशीही शंका आहे. दोन अस्वल आणि बिबट यांचे मृतदेह अजूनही तिथेच पडलेले आहेत.

चंद्रपूर - भद्रावती येथील आयुध निर्माणी प्रकल्पाच्या परिसरात आज सकाळी दोन अस्वल आणि बिबट मृतावस्थेत आढळून आले. एकाच वेळी तीन प्राणी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून बिबट वाघाचा वावर या परीसरात आहे.

परिसरातील लोकांना अनेक वेळा यांचे दर्शन होत असते. त्यामुळे वाघाने या तिघांची शिकार केली असावी, अशी एक शंका आहे. याआधीही या ठिकाणी वाघाने काही प्राण्यांची शिकार केली आहे. एकाच वेळी तिघांचाही मृत्यू झाल्याने हा शिकारीचा प्रकार असावा आणि विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून ही शिकार केली असावी अशीही शंका आहे. दोन अस्वल आणि बिबट यांचे मृतदेह अजूनही तिथेच पडलेले आहेत.
या प्राण्यांचा मृत्यू नक्‍की कशामुळे झाला हे पुढील तपासानंतर सिद्ध होईल. दरम्यान जंगली श्‍वापदांचा मानवी वस्त्यांजवळचा वावर ही दिवसेंदिवस चिंतेची बाब ठरत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one leopard & two bear found dead in Bhadrawati

टॅग्स
टॉपिकस