आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू! जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या 14

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पाटीपुरा येथील मृतांची संख्या दोन तर जिल्ह्यात मृतांची संख्या १४  झालेली आहे. यापूर्वी पाटीपुरा येथे एका  ९५ वर्षीय महिलेचा  २१ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता.

अमरावती :  पाटीपुरा येथील तीस वर्षीय युवकाचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी ( ता. २२)  पहाटे दोन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
संबंधित रुग्णाला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्याचा कोरोना चाचणी अहवाल १६ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. दोन-तीन दिवसांपासून त्याची प्रकृती नाजूक असल्याने संबंधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. यासोबतच पाटीपुरा येथील मृतांची संख्या दोन तर जिल्ह्यात मृतांची संख्या १४  झालेली आहे. यापूर्वी पाटीपुरा येथे एका  ९५ वर्षीय महिलेचा  २१ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता.
 दरम्यान कोविड रुग्णालयातून गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण सात व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये परतवाडा येथील पोलिस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. कोविड रुग्णालयात दाखल  ५५ रुग्णांपैकी ८ रुग्ण वगळता उर्वरित सर्वच रुग्णांची स्थिती सामान्य आहे. त्यांच्यात सर्दी, ताप, खोकला यासंबंधीची कोणतीही लक्षणे नाहीत. आठ व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...

त्यांची प्रकृती नाजूक आहे,  तर उर्वरित सहा व्यक्ती कृत्रिम प्राणवायूवर आहेत. त्यात  एका गर्भवती महिलेचा व सात वर्षीय मुलाचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One more death of corona, count raised to 14

टॅग्स
टॉपिकस