थरारक : खुली झालेली दारू गेली डोक्यात अन् त्याने दारुच्या नशेत केले हे भयंकर कृत्य

crime (2).jpg
crime (2).jpg
Updated on

वाशीम : गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने मद्यविक्रीची दुकाने बंद होती. मात्र, बुधवारी (ता.6) मद्यविक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर शहरात महिनाभरानंतर प्रथमच दारूच्या नशेत एकाला भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी अकोला येथे मृत्यूशी झुंज देत आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पाटणी चौकालगत असलेल्या नंदी मंदिराजवळ अजय काळे व त्याचा मित्र अर्जुन ठेंगडे उभे असताना तेथे शिवा देवकते, गजानन चौधरी, रामू चव्हाण, शुभम चव्हाण, सिद्धांत चव्हाण, हे दारूच्या नशेत आले. त्यांनी जुन्या कारणावरून वाद उकरून काढला व मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये संतोष खरात या युवकाच्या डोक्यात वीट मारली. तर, अर्जुन ठेंगडे याच्या डोक्यावर चाकू व लोखंडी पाइपने मारले. या हल्ल्यामध्ये अर्जुन ठेंगडे हा गंभीर जखमी झाला. 

घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अर्जुन ठेंगडे याला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणामध्ये गजानन चौधरी, रामू चव्हाण व सिद्धांत चव्हाण या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना शनिवार (ता.9) पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील शिवा देवकते व शुभम चव्हाण हे दोन आरोपी फरार झाले आहेत.

मद्यविक्रीच्या निर्णयाला घटनेने सलामी
गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन असल्याने प्रतिबंधात्मक कारवायांव्यतिरिक्त शहर पोलिस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देताच मद्यविक्रीच्या निर्णयाला या घटनेने सलामी दिली आहे. दारू डोक्यात गेल्यानंतर अनर्थच ओढवतो, हे ही अधोरेखीत झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Marathi News Esakal
www.esakal.com