माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

जनेसेवेचे बाळकडून आजोबांपासून ते वडिलांपर्यंत सर्वांकडूनच मिळाले. आजोबा माजी आमदार, वडिल तर माजी राज्यमंत्री, त्यामुळे घरी कोणत्याही गोष्टीची कमरता नाही.

अकोला : माहेर व सासर दोन्हीकडे सुखवास्तू घराणे...वडील राज्याचे माजी गृहराज्यमंत्री...पती शिवसेनेचे पदाधिकारी...सासरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासातील नेते... तरीही कोरोना विषाणू बांधित रुग्णांच्या सेवेसाठी ती अविरत लढा देत आहे. होय...अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या डॉ. काश्मिरा सरनाई ही सध्या पुण्यात कोरोना विरुद्ध फ्रंट लाईन वॉरियर म्हणून लढात देत आहे.

जनेसेवेचे बाळकडून आजोबांपासून ते वडिलांपर्यंत सर्वांकडूनच मिळाले. आजोबा माजी आमदार, वडिल तर माजी राज्यमंत्री, त्यामुळे घरी कोणत्याही गोष्टीची कमरता नाही. लग्न झाल्यानंतर ठाण्यातील आघाडीच्या शिवसेना नेत्यांचे घराणे लाभले. असे असतानाही कर्तव्याला प्रथम प्राधान्य देण्याची आई-वडिलांची शिकवण आणि जनसेवेचा ध्यास घेवून डॉ. काश्‍मिरा पुण्यातील भारती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सेवा देत आहे. 

आवश्यक वाचा - स्वाभिमानीला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का?

सध्या या रुग्णालयात कोरोना विषाणू कक्षात 80 रुग्ण उपचार घेत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. आळीपाळीने त्यांना रुग्णसेवेत दाखल व्हावे लागले. डॉ. पाटील यांची कन्या डॉ. काश्मिरा सरनाईक ही वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून येथे कार्यरत आहे.

हेही वाचा - आनंदाची बातमी : आता टाळेबंदीतही म्हणा 'शुभमंगल सावधान'

विशेष म्हणजे, ती सध्या एमडी करीत असून, पुढील सहा महिन्यात ती शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार आहे. माहेर व सासरकडील राजकीय वर्चस्व बघता एका फोनवर तिला या काळात सुटी मिळाली असती. मात्र रुग्ण सेवेला प्रथम प्राधान्य देत डॉ. काश्‍मिरा कोरोनाविरुद्ध लढा देत आहे.

तेथे ती सर्वांसोबत कोरोना विरुद्धचा लढा लढतेय
डॉ. काश्‍मिरा ही पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सध्या ती भारती वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करते आहे. निवासी डॉक्टर म्हणून ते तेथे कार्यकरत आहे. तेथे ती सर्वांसोबत कोरोना विरुद्धचा लढा लढत आहे. तिच्यासह सर्व फ्रंट वॉरियर्सचे प्रयत्न यशस्वी होऊन या देशावर व राज्यावर आलेले संकट लवकर दूर होईल, असा विश्‍वास आहे.
-आमदार डॉ.रणजित पाटील, माजी गृहराज्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Home Minister's daughter fights against Corona in Pune