esakal | चंद्रपूर हादरले, एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

चंद्रपूर हादरले, एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने अल्पवयीन मुलीला चाकूने भोकसले. या मुलीचा उपचारा दरम्यान नागपुर येथे एका रूग्णालयात काल रविवारला रात्री मृत्यू झाला. हल्लेखोर प्रफुल्ल आत्राम यांला पोलिसांना खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी घरी जात असताना तिच्यावर प्रफुल्लने चाकू हल्ला केला होता. यात ती गंभीरित्या जखमी झाली. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. परंतु तिच्यावर काळाने झडप घातली. या घटनेने चंद्रपुर शहर हादरले आहे.

येथील बाबुपेठ परिसरात ही सतरा वर्षीय मुलगी राहत होते. ती चंद्रपुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. शिवजी यांच्या रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करायची. तिच्या घराचे बांधकाम सुरु असताना प्रफुल्ल सोबत तिची ओळखी झाली. तो विवाहीत असतानाही तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. तिने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही त्याने तिचा पिच्छा सोडला नाही.तिच्या मागे येवून तिला त्रास द्यायचा. एक सप्टेंबरला कामाच्या ठिकाणी रूग्णालयात जावून तिला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. याची तक्रार पिडीत मुलीने रामनगर ठाण्यात दिली. मात्र पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांर्भीयाने घेतले नाही. अदखलपात्र गुन्हा नोंदवून सोडून दिले. त्यामुळे प्रफुल्लची हिंमत वाढली.

त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. 9 सप्टेंबरला ती रूग्णालयातून काम आटोपून सायंकाळी घरी जात असताना वाटेत तिला प्रफुल्लने गाठले. प्रेमाची कबुली दिली. तिने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रफुल्लने तिला चाकूने भोकसले आणि घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तिला चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी नागपुरला हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालविली. प्रफुल्लवर चाकू हल्ला प्रकरणात भांदवी 307 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या मुलीचा मृत्यू होताच शहर पोलिस ठाण्यात भादंवी 302 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला अटक करण्यात आली

loading image
go to top