esakal | 400 हातपंप दुरुस्तीसाठी फक्त एकच युनिट, आदिवासी बांधवांना पाणीटंचाईतून मुक्ती मिळेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

one unit for repairing of 400 hand pump in chichkhaldara of amravati

हातपंप दुरुस्तीची कामे करीत असताना या युनिटवर चालकासोबत तीनच माणसे काम करीत आहेत.  त्यातूनही एक कर्मचारी महिनाभरापासून आजारी रजेवर आहे. त्यामुळे हातपंप दुरुस्तीची दारोमदार फक्त दोन कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी सरपंच संघटनेने केली आहे.

400 हातपंप दुरुस्तीसाठी फक्त एकच युनिट, आदिवासी बांधवांना पाणीटंचाईतून मुक्ती मिळेल का?

sakal_logo
By
मोहन गायन

जामली (जि. अमरावती) : चिखलदरा तालुक्‍याचे भौगोलिक क्षेत्र हे प्रचंड मोठे असून या तालुक्‍यात एकूण 160 गावांचा समावेश आहे. या गावात 400 हातपंप असतानाही त्यांच्या दुरुस्तीसाठी फक्त एकच युनिट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आगामी पाणीटंचाईतून आदिवासी बांधवांना खरोखरच मुक्ती मिळणार काय? असा प्रश्‍न केला जात आहे. 

हेही वाचा - विदर्भात कोरोनाचा कहर! एका दिवसांत १० हजारांवर पॉझिटिव्ह, तर ११९ जणांचा मृत्यू

हातपंप दुरुस्तीची कामे करीत असताना या युनिटवर चालकासोबत तीनच माणसे काम करीत आहेत.  त्यातूनही एक कर्मचारी महिनाभरापासून आजारी रजेवर आहे. त्यामुळे हातपंप दुरुस्तीची दारोमदार फक्त दोन कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी सरपंच संघटनेने केली आहे. चिखलदरा तालुक्‍याचे क्षेत्रफळ हे वर्धा जिल्ह्यापेक्षाही मोठे आहे. मुख्य कार्यालयांपासून शेवटच्या गावाचे अंतर 150 ते 200 किलोमीटरपर्यंत आहे. त्यातही चिखलदरा तालुक्‍यातील आदिवासी नागरिकांना सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथील बऱ्याचशा गावातील पाणीपुरवठा योजना वीजबिलाअभावी तर काही ठिकाणी पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेवटची घटका मोजत आहे. असे असताना हातपंप दुरुस्ती युनिट दिवसाला दोन किंवा तीन गावे करू शकतो. दूरवरच्या गावात फक्त एकच हातपंप दुरुस्ती केली जाते. तालुक्‍यातील क्षेत्रफळ मोठे व युनिट एक, अशी स्थिती झाली असल्यामुळे एका युनिटऐवजी चार युनिटची आवश्‍यक आहेत. ती वाढवण्याची मागणी तालुक्‍यातून होत आहे.

हेही वाचा - 'ते' ७५ जण सेवा द्यायला आले अन् घरी परतलेच नाहीत, रुग्णालयातच घेतला अखेरचा...

नागरिकांना पाणीटंचाईचे चटके -
एखाद्या गावातील हातपंप नादुरुस्त झाल्यास तो दुरुस्त करण्यास कर्मचारी वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागते. अशातच महिला-पुरुष पाण्यासाठी जंगल परिसरात जात असल्याने त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका संभवतो. अशावेळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे हातपंप दुरुस्तीच्या युनिटची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. 

चिखलदरा पंचायत समितीकडून या अगोदर जिल्हा परिषदेला युनिट वाढविण्यासाठी ठराव पाठविला आहे. येत्या दोन दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभा बोलावली आहे. त्या सभेत एकऐवजी दोन युनिट वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, चिखलदरा.
 

loading image