अक्षय तृतीयेला ऑनलाईन सोने खरेदीसाठी नागपूरकरांच्या उड्या...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

शहरात अंदाजे तीन हजार सराफा व्यावसायिक आहेत. त्यातील पाच ते सहा सराफा व्यापाऱ्यांनी सोन्याची ऑनलाईन विक्री सुरू केली. यासाठी व्यापाऱ्यांनी आठवडाभर आधीच तयारी सुरू केली होती. त्यामुळे तुम्ही घरबसल्या ग्राहकांना सोन्याची खरेदी करता आली. खरेदी केलेल्या दागिन्यांची लॉकडाऊननंतर डिलिव्हरी केली जाणार आहे. शनिवारी प्रति दहा ग्रॅम सोने 47 हजार 700 रुपये होते. त्यात आठशे रुपयांची घसरण होऊन ते 46 हजार 900 रुपयांपर्यंत घसरले आहे.

नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदी शुभ समजले जाते. लॉकडाऊनमुळे गेल्या एक महिन्यापासून सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. गुढीपाडव्याचा खरेदीचा मुहूर्त वाया गेल्यानंतर काही सराफा व्यावसायिकांनी प्रत्यक्ष सराफा दुकानात जावून सोने खरेदीचा आनंद घेता येणार नसला तरी ऑनलाईन खरेदीचा पर्याय खुला केला होता. बदलत्या परिस्थितीनुसार ऑनलाईन सोने विक्री करण्याच्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला नागपुरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.

शहरात अंदाजे तीन हजार सराफा व्यावसायिक आहेत. त्यातील पाच ते सहा सराफा व्यापाऱ्यांनी सोन्याची ऑनलाईन विक्री सुरू केली. यासाठी व्यापाऱ्यांनी आठवडाभर आधीच तयारी सुरू केली होती. त्यामुळे तुम्ही घरबसल्या ग्राहकांना सोन्याची खरेदी करता आली. खरेदी केलेल्या दागिन्यांची लॉकडाऊननंतर डिलिव्हरी केली जाणार आहे. शनिवारी प्रति दहा ग्रॅम सोने 47 हजार 700 रुपये होते. त्यात आठशे रुपयांची घसरण होऊन ते 46 हजार 900 रुपयांपर्यंत घसरले आहे.
 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी नवीन वस्तूची खरेदी तसेच पितृपूजन केले जाते. मात्र यावर्षी करोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच बाजार बंद आहेत. यामुळे शहरातील तब्बल शंभर कोटींच्या उलाढालीवर यंदा पाणी फेरले गेले आहे.

सोने, वाहन आणि इलेक्‍ट्रॉनिक बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी तब्बल पन्नास कोटी रुपयांची होणारी सोनेखरेदी यंदा करोनामुळेवर ऑनलाईन सुविधेमुळे दहा टक्केच झाली. 'अक्षय्य" असा हा सण असल्यामुळे गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण या दिवशी खरेदी करण्यावर भर देतो. सोने खरेदी हा यातील महत्त्वाचा घटक. यानिमित्ताने दरवर्षी शहरातील सोन्याची बाजारपेठ ओसंडून वाहत असते. चारचाकी व दुचाकी वाहने खरेदीवरही मोठा भर ग्राहकांकडून दिला जाते. तसेच इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीवरही शहरवासीयांचा भर असायचा. वाहनबाजार आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचीही उलाढाल दरवर्षी कोटीच्या घरात होत होती. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच बाजार बंद असल्यामुळे या सर्वच बाजारात शांतता अनुभवयास मिळाली. तीनही बाजारात कसलीच उलाढाल न झाल्यामुळे अवघ्या एकाच दिवसात तब्बल शंभर कोटींच्या उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रेयसीशी केले घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; फक्‍त तीन महिन्यांसाठी घर घ्यायचा किरायाने, एकेदिवशी...
 

परिस्थितीनुसार बदल स्वीकारला आणि ऑनलाईन सोन्याचे दागिने खरेदीचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवला. लॉकडाऊन असले तरी सोन्याचे वाढते दर लक्षात घेता ऑनलाईन सोने खरेदी करण्याची योजना सुरू केल्याचे ग्राहकांना दुरध्वनी, एसएमएस व सोशल मिडीयाच्या माध्यमातून कळविले. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. 
- राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online gold purchase nagpur