प्रेयसीशी केले घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; फक्‍त तीन महिन्यांसाठी घर घ्यायचा किरायाने, एकेदिवशी...

Fugitive accused arrested in Nagpur
Fugitive accused arrested in Nagpur

नागपूर : अक्षय हा कुख्यात गुन्हेगार... "भाई को डर पैदा करना हैं...!' असे त्याला वाटत होते. त्यामुळेच तो वयाच्या सोळ्याव्या वर्षीच गुन्हेगारी जगतात आला. त्याला आपल्या नावाची दहशत निर्माण करायची होती. त्यामुळेच त्याने एकाचा खून केला होता. तसेच त्याने आपल्या प्रेयशीची तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. त्यामुळे तो पत्नीसह इकडे-तिकडे लपून राहत होता. तो फक्‍त तीन महिन्यांसाठी घर किरायाने घेत होता तर प्रत्येक दोन महिन्यानंतर सीमकार्ड बदलवित होता. मात्र, एकेदिवशी.... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर परिसरातील मंगळवारीत एका युवकाच्या खून प्रकरणात आणि मोक्‍का गुन्ह्यात फरार असलेला अक्षय उमेश रामटेके (वय 27, रा. जाततरोडी नं. 2, इमामवाडा) हा महाल, दसरा रोडवरील घरात लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे प्रमुख अशोक मेश्राम यांना मिळाली. त्यांनी शनिवारी दुपारी सापळा रचून छापा घातला. या छाप्यात अक्षय अलगद अडकला. आरोपीला लगेच हत्याकांड आणि मोक्‍काच्या आरोपात गुन्हा दाखल असलेल्या सदर पोलिस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई युनिट चारचे प्रमुख अशोक मेश्राम, एपीआय किरण चौघुले, दिलीप चंदन यांनी केली.

गेल्या 23 जुलै 2019 ला मंगळवारी बाजारात सुभाष मोहरले नावाच्या युवकाचा खून अक्षय रामटेके, सूर्यकांत उर्फ सूल्ली राजूरकर, टिंकू राजूरकर, रजत फुसाटे आणि अतुल घोष यांनी केला होता. गहाण ठेवलेल्या दुचाकीच्या पैशावरून सुभाष आणि आरोपी अक्षयमध्ये वाद झाला होता. यातून हत्याकांड घडले होते. अक्षय आणि सूर्यकांत हे दोघे फरार झाले होते तर उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. अक्षयवर जवळपास डझनभर गुन्हे दाखल आहेत. 

आरोपीने केला प्रेमविवाह

कुख्यात फरार आरोपी अक्षयने आपल्या प्रेयसीशी तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. त्यामुळे तो पत्नीसह इकडे-तिकडे लपून राहत होता. तो फक्‍त तीन महिन्यांसाठी घर किरायाने घेत होता तर प्रत्येक दोन महिन्यानंतर सीमकार्ड बदलवित होता. पोलिसांच्या भीतीपोटी तो पत्नीला घेऊन नातेवाईक किंवा मित्रांच्या घरी लपून बसत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'भाई को डर पैदा करना हैं...!'

कुख्यात आरोपी अक्षय हा वयाच्या सोळाव्या वर्षीच गुन्हेगारी जगतात आला. त्याला आपल्या नावाची दहशत निर्माण करायची होती. त्यासाठी त्याने आतपर्यंत अनेक गुन्ह्यात सहभाग घेतला. हत्याकांड, खंडणी मागणे, वसुली करणे, सट्टा आणि जुगार, दारू विक्री, अंमली पदार्थ विक्री, ठार मारण्याची धमकी देणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सीताबर्डी, जरीपटका, सोनेगाव, धंतोली, सदर आणि गणेशपेठ या पोलिस ठाण्यामध्ये अक्षयवर 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com