यवतमाळ नगरपालिकेचा तब्बल दहा कोटींचा कर थकीत; वसुली फक्त  28 टक्‍केच 

चेतन देशमुख 
Friday, 27 November 2020

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे उद्योग व व्यवसायांसह सर्वच व्यवहार ठप्प झालेले होते. त्याचा परिणाम कर व बीलबिल वसुलीवर झाला

यवतमाळ : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्याने उद्योग व व्यवसाय बंद होते. त्यामुळेच वसुलीवर त्यांचा परिणाम झाला आहे. शासनाने सक्तीची वसुली न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असे असले तरी यवतमाळ शहरामधील नागरिकांनी कोरोनाच्या काळात 28 टक्के नागरिकांनी कर भरला आहे. मात्र, अजूनही थकीत रक्कम दहा कोटींवर आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे उद्योग व व्यवसायांसह सर्वच व्यवहार ठप्प झालेले होते. त्याचा परिणाम कर व बीलबिल वसुलीवर झाला. रोजगार नसल्याने शासनाने थकबाकी रक्कम भरण्यास मुदत दिलेली होती. सक्तीने कोणाकडूनही वसुली करू नये, असे आदेश दिलेले होते. त्यामुळे वीजबिल, पाणीबिल अशा अनेक बिलांची थकबाकी वाढली होती. 

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

मागणीच्या तुलनेत वसुली अत्यंत कमी आहे. असे असले तरी नगरपालिकेने या काळातही करवसुलीचा उच्चांक केला आहे. नगरपालिकेची थकीत पाणीट्टी सहा कोटी रुपये आहे. चालू मागणी आठ कोटी रुपये असे मिळून एकूण मागणी 14 कोटी रुपयांची आहे. त्यामधील थकीतपैकी तीन कोटी रुपये कर वसूल करण्यात आला. 

चालूपैकीही सव्वाकोटी असे सव्वाचार कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. एक मार्च ते 26 ऑक्‍टोबर या कालावधीपर्यंत 28 टक्‍के करवसुली नगरपालिकेने केली आहे. जिल्ह्यातील नगरपालिकेच्या तुलनेत यवतमाळ नगरपालिकेची वसुली ही सर्वाधिक आहे. वसुली चांगली असली तरी अजूनही थकीत रक्कम दहा कोटी रुपयांच्या घरात आहे. ती वसूल करण्यासाठी नगरपालिकेला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. वसुली कमी असल्याने येत्या काळात विकासकामांवर यांचा परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सविस्तर वाचा - व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

कर भरण्याचे आवाहन

यवतमाळ शहरातील नागरिकांनी आपल्याकडील थकीत असलेली करांची रक्कम भरावी. यासाठी नगरपालिकेने आवाहन केले आहे. त्यामुळे किती नागरिक याला प्रतिसाद देतात, हे महत्वाचे आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी असला तरी वसुली मात्र, संथगतीने सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 28 percent people in Yavatmal paid tax