व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

संतोष ताकपिरे-विनोद कोपरकर
Thursday, 26 November 2020

दीपक नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. तुझ्या कुटुंबीयांची बदनामी करतो, अशी धमकी दिली. शिवाय तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवूणक केली.

यवतमाळ : तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब कुटुंबीयांना माहिती पडली. शिवाय लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केली. त्यामुळे बदनामी होईन, या भीतीने तरुणीने विषारी औषध पिऊन करून आत्महत्या केली. ही घटना भारी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका महिलेने तुमच्या मुलीचा फोटो व्हॉट्‌सॲप स्टेट्‌सवर असून, तिच्या हातावर मुलाचे नाव दिसते, असे सांगितले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद झाला. दीपक नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. तुझ्या कुटुंबीयांची बदनामी करतो, अशी धमकी दिली. शिवाय तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवूणक केली.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

या घटनेमुळे अपमानीत झालेल्या तरुणीने पाण्यात विषारी औषध टाकून पिऊन घेतले. याप्रकरणी मृत तरुणीच्या पालकांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून एक महिला, किसन निमजे (वय ५८), प्रफुल्ल निमजे (वय ३५) व दीपक ढेपे (सर्व रा. भारी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

महागाव तालुक्‍यामध्ये पुन्हा दोन आत्महत्या

देवानंद किसन काळे (वय ३०, रा. बिजोरा) व उत्तम पांडुरंग आढागळे (वय ३०, रा. कोठारी) अशी गळफास घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. एका दिवसाच्या अंतराने या आत्महत्या झाल्या. देवानंद काळे याने घाणमुख जंगलातील एका झाडाला गळफास घेतला. तो विवाहित व घरातील कर्तापुरुष होता. त्याच्या पश्‍चात आईवडील, पत्नी, एक मुलगी आहे.

सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी

दुसऱ्या घटनेत, कोठारी येथील उत्तम पांडुरंग अढागळे याने राजुरा शिवारातील आपल्या शेतात झाडाला गळफास लावून जीवन संपविले. तो बारावीपर्यंत शिकून खासगी वायरमनचे काम करीत होता. तो आदिलाबाद येथे आधी कामे करायचा. लॉकडाऊनपासून तो गावी आला होता. दरम्यान, तालुक्‍यात मागील दीड महिन्यात दहा व्यक्तींनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a young woman for fear of notoriety