esakal | धडक सिंचन विहिरींचे अनुदान रखडले, १०८ पैकी फक्त नऊ विहिरींची कामे पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

only nine well construction complete in saoli of chandrapur

लॉकडाउन लागल्यामुळे अर्थव्यवस्था डगमगली. अनेक शासकीय योजनांना त्याचा फटका बसला. महत्त्वाकांक्षी ठरणारी धडक सिंचन विहीर योजनानाही यातून सुटली नाही.

धडक सिंचन विहिरींचे अनुदान रखडले, १०८ पैकी फक्त नऊ विहिरींची कामे पूर्ण

sakal_logo
By
सुधाकर दुधे

सावली (जि. चंद्रपूर ) :  कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था डगमगली. अनेक लोकोपयोगी योजनांवर संक्रात आली. धडक सिंचन विहीर योजनेलाही त्याचा फटका बसला. अनेक लाभार्थ्यांना विहीर बांधकामाचे अनुदान मिळाले नाही. 2019- 20 या सत्रात तालुक्‍यात 108 विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यातील केवळ नऊ विहिरींची कामे पूर्ण झाली. 99 विहिरींची कामे अनुदानाअभावी रखडली आहेत. 

हेही वाचा - पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवड्याला झुकते माप? अमरावती विभागाला फक्त ९२ लाखांचा टंचाई...

लॉकडाउन लागल्यामुळे अर्थव्यवस्था डगमगली. अनेक शासकीय योजनांना त्याचा फटका बसला. महत्त्वाकांक्षी ठरणारी धडक सिंचन विहीर योजनानाही यातून सुटली नाही. अनुदान रखडल्याने तालुक्‍यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबविते. या योजनांना जलदगतीने अनुदान राशी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरविले. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. लॉकडाउन लागल्यामुळे सरकारी अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. शासन स्तरावर अनेक योजनांना तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. असे असले तरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी धडक सिंचन योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

हेही वाचा - पॅनलचा खर्च करणार कोण? उमेदवारांपुढे पेच; गुडघ्याला...

शासनामार्फत या योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना देण्याची योजना आहे. सावली तालुका परिसरात धडक सिंचन योजनेअंतर्गत सन 2019 - 20 मध्ये 108 विहिरींना मंजुरी देण्यात आली. यातील फक्त नऊ विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले. 99 विहिरीचे बांधकाम अनुदानाअभावी राखले आहे. सावली तालुक्‍यात शासनाने 108 विहिरीसाठी 2 कोटी 70 लाख रुपये मंजूर केले. त्यातील 23 लाख रुपये प्राप्त झाले. यातून केवळ नऊ विहिरीचे बांधकाम करता आले. उर्वरित विहिरीच्या बांधकामाचा निधी रखडला. निधीअभावी शासनाने अद्यापपर्यंत बांधकाम सुरू  करण्याचे पत्र शेतकऱ्यांना दिले नाही. दरम्यान, धडक सिंचन विहिरींचे अनुदान तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 

loading image