आखडता हात : तीनच आमदारांनी दिला कोरोना निधी; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

आखडता हात : तीनच आमदारांनी दिला कोरोना निधी; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

यवतमाळ : कोरोनामुळे (coronavirus) मृतांची संख्या वाढतच आहे. बेड, ऑक्‍सिजनसोबत इंजेक्‍शन, औषधांसाठी रुग्णांसोबत नातेवाइकांची फरफट सुरू आहे. अशास्थितीत इतर भागातील लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेतला आहे. कुणी कोविड रुग्णालय (Covid Hospital) सुरू केले, तर कुणी इंजक्‍शन, औषधी उपलब्ध करून देत आहेत. याबाबतीत जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचे योगदान दिसत नाही. आमदार निधीतील एक कोटी रुपयांपर्यंत निधी देऊ शकतात. जिल्ह्यातील तीनच आमदारांनी (MLA) तसे पत्र दिले असून, अजूनही अनेकांना पत्र देण्यासाठी वेळ मिळालेला नाही. (Only three MLAs gave Corona funds Yavatmal news)

जिल्ह्यात विधानसभेचे सात, विधान परिषदेचे तीन आमदार आहेत. त्यात आमदार मदन येरावार, संजय राठोड, प्रा. डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक, डॉ. संदीप धुर्वे हे विधानसभेचे आमदार आहेत. दुष्यंत चतुर्वेदी, ऍड. नीलय नाईक, डॉ. वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे आमदार आहेत.

आखडता हात : तीनच आमदारांनी दिला कोरोना निधी; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 

सत्ताधारी असो किंवा विरोधक राज्यपातळीवरील नेत्यांसोबत आमदारांची अत्यंत जवळीक आहे. त्यामुळेच सत्ता कुण्याही पक्षाची असो जिल्ह्याला कायम मंत्रिपद मिळाले आहे. असे असतानाही जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. या काळात अनेक लोकप्रतिनिधी ‘गायब' आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारसंघातील रस्ते, रस्ते फिरणारे आमदार सध्या कुठेही दिसत नाहीत. काही आमदारांनी कोरोनाच्या या संकटात मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आहे. नागरिकांना आवश्‍यक असलेल्या बाबींची सोय केली जात आहे.

काही आमदार मात्र, दिसेनासे झाले आहेत. आमदारांना आरोग्याच्या सुविधांसाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांपर्यंत मदत देता येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना निधी देण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक आमदारांनी अजूनही तसे पत्र दिलेले नाही. जिल्ह्यात आमदारांची संख्या मोठी आहे.

वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक व राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी एक कोटी निधीचे पत्र दिले आहे. उर्वरित अनेक आमदरांचे पत्र अद्यापही पोहोचलेले नाही. त्यामुळे अशा या संकट काळात आमदारनिधीसाठी आखडता हात घेतल्याचे दिसत आहे. प्रत्येक आमदारांनी निधी दिल्यास काही प्रमाणात का होईना, रुग्णांना सुविधा मिळणार आहे.

ऑक्‍सिजन मशीनची मदत

आमदार संजय राठोड, मदन येरावार यांनी रुग्णांसाठी ऑक्‍सिजन कॉन्सनट्रेटेड दिल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर रुग्णालयांत ही मशीन आमदारांनी दिली आहे. जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. अशास्थितीत लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन नागरिकांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

तीन आमदारांनी दिले पत्र

संजीवरेड्डी बोदकुरवार - एक कोटी

इंद्रनील नाईक - एक कोटी

प्रा. डॉ. अशोक उईके - एक कोटी

Only three MLAs gave Corona funds Yavatmal news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com