esakal | बाजार समितीमध्ये फक्त गहू आणि तांदूळ!

बोलून बातमी शोधा

Only wheat and rice in the Akola Market Committee!

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अन्नधान्याच्या उपलब्धतेची असुविधा होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु वाहतूक अडचणीमुळे आवकेवर मोठा परिणाम दिसून येत असून, आठवडाभरापासून बाजार समित्यांमध्ये केवळ गहू व तांदुळाची आवक होत आहे.

बाजार समितीमध्ये फक्त गहू आणि तांदूळ!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अन्नधान्याच्या उपलब्धतेची असुविधा होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु वाहतूक अडचणीमुळे आवकेवर मोठा परिणाम दिसून येत असून, आठवडाभरापासून बाजार समित्यांमध्ये केवळ गहू व तांदुळाची आवक होत आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात २२ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच सामाजिक दुरावा ठेवण्यासाठी एसटी, रेल्वे वाहतूक  व्यवस्था बंद करण्यात आली. जागोजागी रस्ते सुध्दा अडविण्यात आले आहेत. परंतु नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी काही व्यवस्था प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

बुलडाणा येथे आज पून्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अन्नधान्याची उपलब्धता व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोना इफेक्ट आणि लॉकडाऊनचा परिणाम बाजार समितीमधील अवकेवर झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन पूर्वी बाजार समित्यांमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, गव्हाची आवक बऱ्यापैकी सुरू होती. परंतु, गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून केवळ तांदूळ व गव्हाची आवक होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.