बुलडाणा जिल्हयात प्रथमच 'ओपन हार्टसर्जरी' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

पश्चिम विदर्भातील चार जिल्हयात बहुदा एकमेव हार्ट अॅण्ड बायपास सर्जरी विभाग असलेल्या शेगाव येथील माऊली हार्ट केअर सेंटर मध्ये प्रथमच एका महिला रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी (ए.एस.डी क्लोजर हार्टसर्जरी) यशस्वी झाली आहे.

शेगाव (जिल्हा बुलडाणा) : पश्चिम विदर्भातील चार जिल्हयात बहुदा एकमेव हार्ट अॅण्ड बायपास सर्जरी विभाग असलेल्या शेगाव येथील माऊली हार्ट केअर सेंटर मध्ये प्रथमच एका महिला रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी (ए.एस.डी क्लोजर हार्टसर्जरी) यशस्वी झाली आहे. शेगावसह परिसरातील रूग्णांसाठी  येथील वै पुरूषोत्तम हरी (गणेश) पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व्दारा संचिलत माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डायलेसिस अॅण्ड हार्ट केअर सेन्टर मध्ये बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच 17 डिसेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. हे हॉस्पिटल अल्पावधीतच विविध आजारांच्या रूग्णांना नवसंजीवनी देणारे वैद्यकियछत्र ठरलं आहे. 

याठिकाणी शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा अमरावती विभागातील पात्र रूग्णांना लाभ दिला जात आहे.  याबाबत माऊलीचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील, हृदयरोग व शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अंबरीश खटोड, डॉ. तुषार चरखा यांनी 22 डिसेंबर रोजी पत्रकारांशी बोलतांना सविस्तर माहिती दिली. ती अशी की, एका 27 वर्षीय विवाहीत महिलेस प्रसुतीनंतर काही दिवसांनी हृदय विकाराचा त्रास वाढला असता आरोग्य तपासणी व चाचण्यांवरून त्यांना जन्मतःच हृदयाला छीद्र असल्याचे समजले. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनी निदान करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांना दिला होता. यापूर्वी त्यांनी रायपुर व शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार केले. मात्र त्याला यश आले नाही त्यामुळे मिळालेल्या माहितीवरून सदर महिला रुग्णास नातेवाईकांनी शेगाव येथील माऊली हार्ट केअर सेन्टर येथे दाखल केले. त्यांचे पुर्वीचे रिपोर्टस लक्षात घेवुन अतिदक्षता विभागात वैद्यकिय तपासणी व चाचण्या करून 17 डिसेंबर रोजी ओपन हार्ट सर्जरीव्दारे हृदयात असलेले छीद्र भुजवुन उपचाराची गरज असल्याचे निदान हृदयरोग व शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ. अंबरीश खटोड यांनी करून, त्यांच्यावर गुरुवार 19 डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी वैद्यकिय क्षेत्रातील व हृदय शस्त्रक्रियेचा दांडगा अनुभव असलेले तज्ञ डॉ. अंबरीश खटोड, उपचार तज्ञ डॉ. तुषार चरखा, कार्डियाक अॅनॅस्थेटिक भुलतज्ञ डॉ. विजय श्रोते यांनी अतिशय संवेदनशिल शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्याप्रसंगी राकेश वर्मा,  दिपक राघबनसिंग, विजय पांडव, मनिषा इंगळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर महिला रूग्ण हया मोदीनगर, येथील सर्वसामान्य कुटूंबातील असुन आर्थीक परिस्थीती नाजुक असल्यामुळे मुंबई, पुणे किंवा नागपुर सारख्या ठिकाणी उपचारासाठी जाण्याचा मोठा प्रश्न रूग्ण व कुटूंबियांना पडला होता. मात्र माऊली ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील व माऊली हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या  रूपाने श्रीं नीच तिचे प्राण वाचवल्याचे भावुक उद्गार रूग्णमहिलेच्या नातेवाईकांनी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काढले. गेल्या आठवड्यात राजोंदा तालुका बार्शिटाकळी जिल्हा अकोला येथील शेतकरी रूग्णांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहीनीत ब्लॉकेज (रक्ताच्या गाठी) असल्याचे निदान अकोला येथील डॉक्टरांनी केले होते,  सीव्हीटीएस सर्जन डॉ. अंबरीश खटोड, फिजीशीयन तज्ञ डॉ. तुषार चरखा, भुलतज्ञ डॉ. अभिजीत साबु व सहायक डॉक्टरांच्या चमुने रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून उपचार केले रुग्ण बरा होवुन त्यांना 14 डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिला आहे. किडनीच्या आजाराने ग्रस्त रूग्णांवर डायलेसिस उपचाराकरीता फिस्तुला या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रूग्णांना अकोला जाण्याची गरज राहिली नाही.

हेही वाचा - केंद्रीय राज्यमंत्र्यांना बसला राज्य शासनाच्या निर्णयाचा फटका

 माऊली ग्रुपचे अध्यक्ष  ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी परिसरातील वैद्यकिय सेवेची गरज लक्षात घेवुन नुकतच गेल्या महिन्यात आधुनिक पध्दतीने अद्यावत असलेल्या सीव्हीटीएस विभागाची सुरूवात कली आहे. "ना नफा ना तोटा" तत्वार सेवाभावी उपचार पध्दती हे वैशिष्ट असलेल्या माऊली मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल,  डायलेसीस अॅण्ड हार्ट केअर सेन्टर मध्ये सुसज्ज बायपास सर्जरी विभाग, अतिदक्षता विभाग, फिजिओथेरपी विभाग, ब्लड स्टेरेज, क्ष-किरण एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी, रूग्णवाहीका तज्ञ डॉक्टर्स, तत्पर सेवाभावी कर्मचारी इत्यादी सेवांचा लाभ परिसरातील गरजु रूग्णां मिळत असल्यामुळे सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. 

लवकरच एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी
ओपन हार्ट सर्जरी बायपास सर्जरी व हृदयासंबंधी इतर शस्त्रक्रिया तसेच फिस्तुला या वैद्यकिय सविधेमुळे पश्चिम विदर्भातील रूग्णांना मुंबई, पुणे, शिर्डी सारख्या ठिकाणी जाण्याची गरज निश्चितच कमी पडेल. कारण याठिकाणी लवकरच एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी करण्याचा मानस असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.

 डॉक्टराना ईश्वराचे दुसरे रूप मानले जाते त्यांचे प्रयत्न व संत गजानन महाराजांच्या आशिर्वादामुळेच या महिलेला तसेच अन्य रुग्णास जिवदान मिळत आहे.
- ज्ञानेश्वर पुरोषोत्तम पाटील,  संस्थाध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open heart surgery for the first time in Buldana district