
जवाहरनगर (जि. भंडारा) : शहापूर येथे एका वाहनातून ३०७ किलो अफूची तस्करी करताना पोलिसांनी कारवाई केली. यात राजस्थानातील दाेन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांचे नाव दिलीप गंगाराम बिश्नोई (वय २४) आणि जयप्रकाश सहीराम बिश्नोई (वय २५)असे आहेत. या कारवाईत एकूण ८५ लाखांचा माल जप्त केला आहे.