एनआरसीला विरोध; फुलसावंगीत कडकडीत बंद

file photo
file photo
Updated on

यवतमाळ  : नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाविरोधात सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील काही गावात निषेध आंदोलन करण्यात आली. शनिवारी (ता.21) काळी दौलत व फुलसावंगी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला तर मारेगावात सर्वधर्मीय नागरिक एकवटले. मारेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार दीपक पुडे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात तालुक्‍यातील सर्वधर्मीय जनतेचे एकत्र येऊन नागरिकत्व कायद्याचा विरोध केला. यात महिलांची गर्दी लक्षणीय होती. शहराच्या प्रमुखमार्गाने सदर मोर्चा केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी झेबा खान, झेबा शेख, शिवसेनेचे गजानन किन्हेकार, मराठा सेवा संघाचे अनंता मांडवकर, बळीराजा विदर्भ पार्टीचे होमदेव कनाके, नगरसेवक उदय रायपुरे, नगरसेवक भारत मत्ते, राजू निमसटकर, शरीफ अहेमद, भाकपचे अनिल घाटे, जितेंद्र नगराळे, आकाश बदकी, विप्लव ताकसांडे, एआयएसएफचे राकेश खामणकर आदींनी विचार व्यक्त केले. मोर्चात मारेगाव, कुंभा, नवरगाव, मार्डी, वेगाव, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संचालन महेमूद खान यांनी केले. बंडू गोल्हर यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी जुबेर पटेल, गजानन चंदनखेडे, पप्पू पठाण, इकबाल सय्यद, सालिद पटेल, जावेद शेख, ज्ञानेश्‍वर धोपटे, समीर कुडमेथे, प्रीतम तेलतुमडे, खलिल शेख आदींनी पुढाकार घेतला.

काळी दौलत, फुलसावंगीत कडकडीत बंद

महागाव : केंद्र सरकारने पारीत केलेल्या नागरिकत्व विधेयकाविरोधात काळी (दौलत), फुलसावंगी या गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठेही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सर्वत्र बंद शांततेत पाळण्यात आला. 
काळी दौलत येथील बाजारपेठ बंद करून केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. या कायद्यामुळे अनुच्छेद 14/15 चे उल्लंघन होत देशातील वातावरण ढवळून निघाले असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. 
जगात धर्मनिरपेक्ष आणि सक्षम लोकतंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या देशात काळीमा फासण्याचे काम केंद्र होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे हे विधेयक मागे घेण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांकडून मार्केट बंद करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांच्यामार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना उकंडा राठोड, वहाब भाई, आझाद पटेल, शेख हरून, सय्यद इरफान, नासीर खान इत्यादींची उपस्थिती होती. 

बंदला सर्व व्यापाऱ्यांचा पाठिंबा

फुलसावंगी : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व संशोधन कायदा व एन आर सी विरोधात शनिवारी फुलसावंगीत कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महागाव पोलिस व सीआरपीएफच्या तुकडीकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदला सर्व व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने बंद शंभर टक्‍के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com