मी विदर्भाचा नातू, विकासात कसूर करणार नाही...

uddhav thakrey
uddhav thakrey

नागपूर : मी विदर्भाचा नातू आहे. आजोळचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासात कुठलाही कसूर करणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केले. याचबरोबर त्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विदर्भासाठी घोषणांचा पेटारा उघडला. 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी लावून धरली होती. यावरून सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील घोषणाबाजी करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा मुद्यावरून विरोधकांनी संपूर्ण अधिवेशन काळात धारेवर धरण्याचा प्रयत्न केल होता. अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनुसार सप्टेंबर 2019 पर्यंतचे शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. 

पूर्व विदर्भासाठी स्टिल प्लांटची घोषणा 
विदर्भात 123 सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहेत. यापैकी कोणत्याही कामांना स्थगिती दिलेली नाही. विदर्भातील सिंचनाचे सर्व प्रकल्प जून 2023 पर्यंत पूर्ण करणार आहोत. तसेच पूर्व विदर्भात जमशेदपूर व भिलाईच्या धर्तीवर स्टिल प्लांट उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएमओ (मुख्यमंत्र्यांचे कार्यालय) सुरू करण्यात येणार आहे. ते कार्यालय थेट मंत्रालयातील सीएमओशी जोडलेले असेल. गोरगरीबांना 10 रुपयांमध्ये शिवभोजन योजना सुरू करणार. प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - अध्यक्ष महोदय, मी घोटाळा केला नाही

यवतमाळ जिल्ह्यासाठी 253 कोटी 
गोसी खुर्द प्रकल्पाचे काम 2022 पर्यंत पूर्ण करणार. यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 253 कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. सिंचनाचा कोणताही अनुशेष राहिल्यास माझ्या लक्षात आणून द्या, कोणताही अनुशेष ठेवणार नाही. समुद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार, कर्जामुळे व्याजापोटी पैसे द्यावे लागत होते. ते पैसे आता सरकार देईल. कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करू. या माध्यमातूल पाच लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल. 

महत्त्वाची बातमी - समृद्धी महामार्ग नाही, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग

धान उत्पादकांना आता 700 रुपये बोनस 
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात 500 रुपये देण्यात येत होते. ते वाढवून अधिकचे 200 रुपये देणार आहे. आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणार. अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार. लोणार सरोवराचे सौंदर्य संमोहित करणार, विदर्भात पर्यटनाच्या सोयी-सुविधा वाढवणार, विदर्भात मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार, नागपुरातील मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही, अशी हमी देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी -  शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार

मला तुमची मदत लागेल 
विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नसल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देणर असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार हे सरकार शब्दाला जागले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसल्याचा आरोप फडणवीसांनी केला. 

अचलपूरमध्ये वास्तव्याला होते बाळासाहेब ठाकरे 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे परतवाडा येथील उघडे यांच्या घरात भाड्याने राहत असल्याचे व ते न्यायालयात बेलीप या पदावर कार्यरत असल्याचे सर्वश्रूत आहे. त्यामुळेच बाळासाहेबांचे बालपणाचे काही दिवस अचलपूरच्या (जि. अमरावती) उघडे वाड्यात गेल्याची माहिती स्व. चंपालाल उघडे यांचे नातू व किराड वाड्याचे मालक विनय उघडे यांनी दिली. त्यांच्या मते आजोबा व वडिलांनी सांगितल्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालवयात या वाड्यातील दोन खोल्यांमध्ये राहत होते. मात्र, बाळासाहेब कोणत्या साली येथे राहिले हे सांगणे कठीण आहे. तसेच बाळासाहेबांना बालपणी येथे बघितलेल्यांपैकी कोणीही हयात नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांविषयी अधिक माहिती मिळविणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com