अवयवदानाची जनजागृती आता शाळेतूनच

मनीष जामदळ
सोमवार, 9 एप्रिल 2018

यवतमाळ - अवयवदानाचे महत्त्व शालेयस्तरावरून विद्यार्थ्यांना कळावे, घराघरांत याची माहिती पोहोचावी, यासाठी यंदा दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात अवयवदानाचा पाठ अंतर्भूत करण्यात आला आहे.

देशात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत व दोन हजारांहून अधिक हृदयविकाराने ग्रस्त रुग्ण असून, या रुग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्तशुद्घीकरण  हा पर्याय आहे. परंतु, यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी ग्रस्त रुग्णांना असा कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आहे. 

जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाची जाणीव असल्यास त्यासाठी संमती सहज मिळू शकेल. ही बाब लक्षात घेता देशात अवयवदानाचे महत्त्व व माहिती घराघरांत पोहोचावी, अवयवदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाने दहावीच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन’ या पुस्तकात पान क्रमांक ८९वर अवयवदान, अवयव प्रत्यारोपण व देहदानाची माहिती देणारा पाठ समाविष्ठ केला आहे. 
अवयवदानासोबतच देहदान या विषयावरही माहिती यात दिली आहे. या निर्णयामुळे शालेय जीवनापासूनच मुलांना अवयवदानाचे महत्त्व, अवयवदान म्हणजे नेमके काय, अवयवदान कधी  व कोणाला करता येते, याबाबतची माहिती मिळणार आहे. 

या पुस्तकात अवयव प्रत्यारोपण  म्हणजे काय, कोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. देहदान म्हणजे काय, याचा वापर संशोधनासाठी कसा केला जातो, याबाबत विस्तृत माहिती या पुस्तकात दिली आहे.

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात नागरिकांनाच मोठा फायदा होणार आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अवयवदान, प्रत्यारोपण व देहदानाचे महत्त्व कळणार असल्याने भावी पिढीस अडचण जाणार नाही.
- डॉ. टी. सी. राठोड, सदस्य, विभागीय प्रत्यारोपण समिती, पश्‍चिम विदर्भ अध्यक्ष, एपीआय

Web Title: organ donate Public awareness in school