Teacher Recruitment: महाराष्ट्रात महाविद्यालयीन प्राध्यापकांची १२ हजार पदे रिक्त
Higher Education: महाराष्ट्रात सध्या १२,२५३ प्राध्यापक पदे रिक्त असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून तातडीने या पदांची भरती करण्याची मागणी केली आहे. शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.
पुसद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन, अमरावती विभागाने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील रिक्त प्राध्यापक पदांची भरती तातडीने करण्याची मागणी केली आहे.