
अविनाश साबापुरे
यवतमाळ : सोमवारपासून अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. मात्र राज्यातील तब्बल दोन हजार शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी या प्रक्रियेत सहभागच घेतलेला नाही. आता या शाळा-महाविद्यालयांचा शोध घेऊन त्यांना जाब विचारण्याची वेळ शिक्षण विभागावर येणार आहे.