esakal | गडचिरोलीतील 23 हजार 73 मातांना 'मातृवंदना' चा लाभ; तब्बल 13 कोटी 22 लाख 61 हजारांचे अनुदान थेट खात्यात जमा
sakal

बोलून बातमी शोधा

over 23 thousand women got benefit of PM Matruvandana Yojna

भारतातील असंख्य महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे गर्भवती (महिला) गरोदर व स्तनदा माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन कधी कधी मृत्यू संभवतो

गडचिरोलीतील 23 हजार 73 मातांना 'मातृवंदना' चा लाभ; तब्बल 13 कोटी 22 लाख 61 हजारांचे अनुदान थेट खात्यात जमा

sakal_logo
By
खुशाल ठाकरे

गडचिरोली : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या 24 हजार 585 (महिलांची) गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 23 हजार 73 मातांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 13 कोटी 22 लाख 61 हजार एवढे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक! १० वर्षांच्या मुलाची हत्या करून आईने संपवले जीवन; संसाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

भारतातील असंख्य महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे गर्भवती (महिला) गरोदर व स्तनदा माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन कधी कधी मृत्यू संभवतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर आणि स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून राबविण्यात आली आहे. 

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम असून अशा ठिकाणी मातांना याचा लाभ मिळत असल्याने मातांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन मातृत्व स्वीकारताना त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 73 मातांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अहेरी तालुक्‍यातील 2435, आरमोरी 2351, भामरागड 575, चामोर्शी 3687, धानोरा 1868, एटापल्ली 1371, गडचिरोली 3589, कोरची 1289, कुरखेडा 2251, मुलचेरा 1427, सिरोंचा 1678, वडसा तालुक्‍यातील 2064, अशा एकूण 24 हजार 585 मातांची योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे.

जाणून घ्या - मैत्रिणीवर शेरेबाजी केल्याने काढली पिस्तूल; क्षणभरात ढाबा रिकामा झाल्यानंतर सत्य आले समोर

तीन टप्प्यांत मदत

मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसांच्या आत नोंदणी केल्यास पहिला लाभ 1 हजार रुपये, शासकीय व खासगी आरोग्य संस्थेत प्रसूतिपूर्व किमान एकदा आरोग्य तपासणी व चाचणी केल्यास 2 हजार रुपये, बाळाचे साडेतीन महिन्यांपर्यंतचे लसीकरण पूर्ण केल्यास तिसरा लाभ 2 हजार रुपये, असे एकूण 5 हजार रुपये इतका लाभ दिला जातो.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image