School Uniform : राज्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे गणवेश वांध्यात; नॉन बीपीएल विद्यार्थ्यांचा समावेश; निधी वितरण थांबले
Education Scheme : महाराष्ट्रातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना गणवेश वितरण थांबल्याने वांधा निर्माण झाला आहे. राज्य शासनाने निधी न दिल्यामुळे यवतमाळसह आठ जिल्ह्यांतील नॉन बीपीएल विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत.
यवतमाळ : यंदा विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळे गणवेश वाटपाचा निर्णय फसला. शालेय गणवेश सुरवातीला देण्यात आला. परंतु स्काऊट गाइडच्या गणवेशाची वांदेवाडी झाली आहे. मध्यंतरी केंद्रशासनाने समग्र शिक्षा अभियानाला गणवेशाचे पैसे दिले.