esakal | भरधाव कार उलटून दोन ठार
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

भरधाव कार उलटून दोन ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कारंजा (जि. वर्धा) : नागपूर येथून अमरावतीकडे जात असलेली भरधाव कार उलटून दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. चार) सायंकाळी कारंजा तालुक्‍यातील ठाणेगाव येथे घडली.
गौतम मेश्राम (वय 24) आणि अक्षय निहाटकर (वय 22) (दोन्ही रा. चांदूररेल्वे, जि. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या वाहनातील चालक मोहम्मद इजाज मोहम्मद जलील हा जखमी झाला. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारने (क्र. एमएच 01 बीवाय 5908) गौतम मेश्राम आणि अक्षय निहाटकर व अन्य तिघे चांदूररेल्वेकडे जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही कार रस्ता दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की अमरावतीकडे जाणाऱ्या कारमधील गौतम मेश्राम आणि अक्षय निहाटकर हे दोघे जागीच ठार झाले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या कारमधील तिघे थोडक्‍यात बचावले. यात केवळ चालक गंभीर जखमी झाला.

loading image
go to top