esakal | जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; अण्णा ४६ वर्षांपासून देतो १० रुपयांत पोटभर जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : काही श्रीमंत फक्त नावासाठी श्रीमंत असतात. ते इतके चिकट असतात की आपल्या जवळचा एक रुपयाही दुसऱ्यांसाठी खर्च करीत नाही. काही जण भरभरून दान करतात. अशा लोकांबद्दल कितीही बोला ते कमीच. याउलट गरीब लोकांचे असते. स्वतः कितीही गरीब असले तरी दुसऱ्यांची मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. स्वतः दोन घास कमी खाणार; मात्र दुसऱ्यांची मदत केल्याशिवाय राहत नाही (Full meal). असेच गरिबीचे चटके सहन करून दुसऱ्यांची मदत करणाऱ्याचे नाव आहे अण्णा (Social work). अण्णा म्हणजे देवमाणूस... (Anna-has-been-giving-a-full-meal-for-Rs-10-for-46-years)

अण्णा... अण्णा यांचे खरं नाव राजामनी विरयन पाली आहे. त्यांचा जन्म तामिळनाडूतील वेरूळ जिल्ह्यातील अरकॉट येथे झाला. मोठे बंधू क्रिष्णा पाली यांनी १९७५ मध्ये अण्णाला रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन देत नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे आणले. मात्र, अण्णा उच्चशिक्षित नसल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. यामुळे मोठ्या भावाने खापरखेडा पोलिस ठाण्या समोर लहान हॉटेल लावून दिले. मात्र, ते हॉटेल फार काळ काही टिकले नाही.

हेही वाचा: ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

हॉटेल बुडाल्यानंतर अण्णा यांनी खापरखेडा-दहेगाव-सिल्लेवाडा टी पॉइंट परिसरात एका झाडाच्या खाली झोपडीवजा हॉटेल उघडले. या गोष्टीला आज तब्बल ४६ वर्षे लोटून गेली आहेत. इतक्या वर्षांमध्ये अनेकांची स्थिती सुधारते. मात्र, आजही अण्णा यांचे झोपडीत हॉटेल सुरू आहे. ते इंदिरानगर झोपडपट्टीत वास्तव्य आहे.

ते ४६ वर्षांपासून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फक्त दहा रुपयांमध्ये डाळ आणि भात असे पोटभर जेवण देत आहे. अण्णा ४६ वर्षांपासून दीन दुबळ्यांची सेवा करीत आहे. ते आजही मोडक्या तोडक्या हॉटेलमध्ये फाटक्या कापडात राहतात. त्यांचे स्वतःचे घर नाही. तसेच दारिद्र रेषेखालीही नाव नाही. यामुळे त्यांना शासकीय सेवेचा लाभ मिळत नाही.

हेही वाचा: सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेने घातला १९ लाखांनी गंडा

‘अण्णामोड’ हीच अण्णाची कर्मभूमी

खापरखेडा-दहेगाव-सिल्लेवाडा मार्गाला जोडणाऱ्या टी पॉइंट परिसराला नागपूर जिल्ह्यात अण्णामोड नावाने ओळखले जाते. खापरखेडा परिसरातील ‘अण्णामोड’ हीच अण्णाची कर्मभूमी आहे. याच ठिकाणावरून ४६ वर्षांपासून अण्णा दिन-दुबळ्या व गोरगरीब जनतेची सेवा करीत आहे. महागाईच्या काळात गोर गरीब सर्व सामान्य जनतेला अण्णा हॉटेलमध्ये १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.

बस थांब्याला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव

स्वतः गरिबीचे चटके सहन करून ते लोकांना पोटभर खायला देत आहे. तब्बल ४६ वर्षांपासून अण्णा हे समाजकार्य करीत आहे. यामुळे परिसरात त्यांना सर्वच ओळखतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अण्णाच्या कार्याची दखल घेत बस थांब्याला ‘अण्णा मोड बस थांबा’ असे नाव दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा गोरगरीब जनतेची सेवा करणारे अण्णा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही

बस थांब्याला माझे नाव दिल्याने फार आनंदी आहे. मी याचा कधीही विचार केला नव्हता. आता मला काहीही बोलायचे नाही.
- अण्णा

(Anna-has-been-giving-a-full-meal-for-Rs-10-for-46-years)

loading image
go to top