पांढरकवडा ट्रामा केअर युनिट नावालाच

file photo
file photo

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : एखाद्या ठिकाणी अपघात घडून गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात "ट्रामा केअर युनिट' उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी अत्यावश्‍यक साधनसामुग्री (मशनरी) या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हा देशातील सर्वांत मोठा लांबीचा मार्ग आहे. हा महामार्ग पांढरकवडा शहराला लागून गेला असून, या ठिकाणी 24 तास वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास त्यातील झालेल्या रुग्णांना उपचारासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र, अत्यंत गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांना पुरेशा सोयी-सुविधांअभावी यवतमाळ येथे रेफर केले जाते. पांढरकवडा ते यवतमाळमधील अंतर जवळपास 70 किलोमीटरचे असल्याने यामध्ये रुग्णांवर तातडीने उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग व तालुक्‍यातील ग्रामीण भागात दैनंदिनी अनेक छोटे-मोठे अपघात घडून येतात. अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार होण्यासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपये खर्चून ट्रामा केअर युनिटचे बांधकाम करण्यात आले आहे. मागील दीड वर्षापूर्वी अटी व शर्तीनुसार हे युनिट उपजिल्हा रुग्णालयास हस्तांतरित झाले आहे. सध्यास्थितीत शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी तज्ज्ञमंडळी व कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र, शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी महत्त्वाची साहित्य (मशनरी) उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेले येथील ट्रामा केअर युनिट केवळ शोभेची वस्तू बनली आहे.

अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यास लागणारी अत्यावश्‍यक साधनसामग्रीची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. त्याची पूर्तता होताच ट्रामा केअर युनिटमध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल.
- डॉ. संजय तोडासे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com