Pandhurna Gotmar Festival 2025: पांढुर्णाच्या गोटमारीत पाचशे जण जखमी; पांढुर्णा ते सावरगाव दरम्यानच्या जाम नदीतीरावरची परंपरा
Indian Culture: पांढुर्णा येथे पारंपरिक गोटमार यात्रा उत्साहात पार पडली असून पाचशेपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. या यात्रेला ऐतिहासिक आख्यायिका व श्रद्धेचा मोठा वारसा जोडलेला आहे.
वरुड : मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील प्रसिद्ध गोटमार शनिवारी (ता.२४) पांढुर्णा ते सावरगाव दरम्यानच्या जाम नदीच्या तीरावर परंपरेप्रमाणे पार पडली. या गोटमारीत पाचशेपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.