Fake Certificates: रामटेकमध्ये शिक्षण मंडळाच्या नावाने समांतर बोर्ड! विद्यार्थ्यांना वाटल्या दहावी, बारावीच्या गुणपत्रिका
Ramtek Education Scam: रामटेकमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षा मंडळ नावाने समांतर बोर्ड उभारून अनेक विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या गुणपत्रिका दिल्या गेल्या. फक्त एका खोलीत दोन कर्मचारी चालवत असल्याचे समोर आले असून राज्य सरकारची मान्यता नाही.
रामटेक : रामटेक येथे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाला विदर्भ माध्यमिक शिक्षा मंडळ या नावाने समांतर बोर्ड सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या गुणपत्रिका देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.