esakal | पारडी उपवनक्षेत्रात ‘त्याची’ दहशत…नागरिक, शेतकऱ्यांना जाण्या-येण्यास मनाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भागात वाघ पाहावयास मिळत आहेत. वाघाला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतात. मात्र पावसाळ्यात येथे पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. कोरपना तालुक्यातील पारडी वनक्षेत्र परिसरात एका वाघाने बस्तान मांडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनीही जंगल परिसरात फिरू नये, असे वनविभागाने म्हटले आहे.

पारडी उपवनक्षेत्रात ‘त्याची’ दहशत…नागरिक, शेतकऱ्यांना जाण्या-येण्यास मनाई

sakal_logo
By
सिद्धार्थ गोसावी

कोरपना (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यात पारडी उपवनक्षेत्रातील सावलहिरा, सिंगारपठार, घाटराई, टांगाळा, जांबुळधरा, उमरहिरा या परिसरात धबधबे आहेत. पावसाळा असल्याने धबधबे ओसंडून वाहत आहेत.

मात्र, याच परिसरात सध्या वाघाचा वावर वाढला आहे. त्यामुळे या परिसरात येण्यावर वनविभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे.

गाईची केली शिकार

वनसडी वनक्षेत्रात येणाऱ्या पारडी उपवनक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी एका गायीला वाघाने फस्त केले. सध्या या परिसरात वाघोबा ठाण मांडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतावर जाणे-येणे बंद केले आहे. वनविभागाने सावधानतेचा इशारा म्हणून जंगलात कुणीही फिर नये, असे आवाहन केले आहे. या भागातील जंगल परिसरात अनेक धबधबे आहेत.

पर्यटकांना मनाई

पावसाने ते ओसंडून वाहत आहेत. मात्र, वाघाचा वावर असल्याने पर्यटकांनाही येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. या जंगलव्याप्त क्षेत्रात सावलहिरा, सिंगारपठार, घाटराई, टांगाळा, जांबुळधरा, उमरहिरा, थिप्पा, रुपापेठ, पारडी, परसोडा, गोविंदपूर ही गावे येतात. या गावांतील शेतकऱ्यांनी शेती जंगलाला लागूनच आहे. मात्र, वाघाच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यास मागेपुढे बघत आहेत.
 

जाणून घ्या : विरोधी पक्षाला दुसरा धंदाच नाही; कोणी केले हे विधान व का? वाचा सविस्तर

जंगलात फिरू नये
जंगलात दिवस-रात्र गस्त सुरू आहे. ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी जंगलात फिरू नये.
- एस. एन. बासनवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनसडी.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)