esakal | विरोधी पक्षाला दुसरा धंदाच नाही; कोणी केले हे विधान व का? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Vadettiwar inspected the flood affected villages in Nagpur district

वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात केलेल्या पाहणी दौऱ्यात पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप गावाला भेट दिली. जिथे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोरोना काळ संपल्यानंतर चर्चा करण्याची हमी दिली. 

विरोधी पक्षाला दुसरा धंदाच नाही; कोणी केले हे विधान व का? वाचा सविस्तर

sakal_logo
By
सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : मध्यप्रदेश सरकारने ८५ मिली मीटर पाणी पडणार असल्याची माहिती दिली होती. परंतु, ४५२ मिली मीटर पाण्याची नोंद मध्यप्रदेशात झाल्याने पाण्याचा अति विसर्ग महाराष्ट्रात झाला. झोपलेलं मध्यप्रदेश सरकार आणि हवामान खात्याच्या चुकीच्या माहितीमुळे राज्यावर ही वीपदा आली. या वीपदेला सर्वस्व जबाबदार मध्यप्रदेशातील भाजप सरकार असल्याची टीका व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

पेंच प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, मौदा तालुक्यात हजारो हेक्टर धान शेतीसह अनेक गावे पाण्याखाली आली. यामुळे  शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वत: नागपूर जिल्हातील पूरग्रस्त भागात पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात केलेल्या पाहणी दौऱ्यात पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप गावाला भेट दिली. जिथे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोरोना काळ संपल्यानंतर चर्चा करण्याची हमी दिली. सोबत वडेट्टीवार यांनी पूर्णपणे पडलेल्या घरासाठी ९५ हजार रुपये, नुकसान शेतीसाठी हेक्टरी २० हजार ४०० रुपये एवढी मंदत तसेच जनावरे, दुकानदार या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे, जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे, पंचायत समिती सभापती मीणा कावळे, पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, सरपंच सुभाष नाकाडे, उपसरपंच रविंद्र दोडके, गज्जू यादव, बबलू बर्वे, एसडीओ कट्यारे, तहसीलदार सहारे, बीडीओ बम्हणोटे ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - भावी लष्करी अधिकार्यांच्या सुविधेसाठी लालपरी सज्ज, तब्बल एवढ्या फेर्या

शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढता येणार नाही

पूरग्रस्त गावातील पूर्णपणे पडलेल्या घरासाठी ९५ हजार रुपये, शेतीसाठी हेक्टरी २० हजार ४०० रुपये एवढी मदत घोषित करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विजय वडेट्टीवार यांनी दिली. शेतकर्यांच्या नुकसानीला मदत कितीही केली तरी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ते भरून काढता येणार नसल्याची खंत व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

विरोधी पक्षनेत्यांचा काढला चिमटा

विरोधी पक्षनेते हे देखील सध्या पूरग्रस्त भागात दौऱ्यावर असताना महाआघाडी सरकारवर टीका केली होती. त्याचेच प्रतिउत्तर म्हणून वडेट्टीवार यांनी सकाळ सोबत बोलताना ‘विरोधी पक्षनेत्यांनी टीका करून आनंद घ्यावा, आम्ही काम करून आनंद घेऊ’. कधीतरी २०,४०० रुपये हेक्टरी मदत आणि १२ हजार ७०० रुपये बोनस मागच्या सरकारच्या काळात मिळाली होती काय, असा प्रश्न उपस्थित करून वडेट्टीवारांनी माजी मुख्यमंत्राच्या चिमटा काढला.

तेव्हा कोण झोपले होत?

मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात कोल्हापूर, सातारा, सांगलीला पूर आला तेव्हा कोण झोपले होत हे महाराष्ट्रनी पाहिले असल्याचे म्हणत आरोप करण्याशिवाय विरोधी पक्षाला दुसरा धंदाच नसल्याचे सांगत वडेट्टीवारांनी विरोधी पक्षाला धारेवर धरले.

संपादन - नीलेश डाखोरे