हॉरररं... मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या नागरिकांची झाली धावाधाव, दिसले हे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

माहिती या प्रभागाचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांना दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. अर्धवट जळालेला पाय महिलेच्या असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत घटनास्थळी पोहोचले होते. 

चंद्रपूर : शहर तुकूम... येथील विधी महाविद्यालयाचा परिसर... सोमवारी पहाटे नागरिक मॉर्निंग वॉकसाठी गेले... मार्निंग वॉक सुरू असताना धावपळ उडाली. काय झाले कुणाला काही समजे ना... सर्वजण एकमेकांना प्रश्‍न विचारत होते... तेव्हा एकाने अर्धवट जळालेला हात दिसल्याचे सांगितले.... भयभीत नागरिक हात पाहण्यासाठी गर्दी करीत होते. चंद्रपूर शहरात दिवसभर जळालेल्या हाताची चर्चा सुरू होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधी महाविद्यालयाच्या परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी नागरिक फिरायला जातात. हा परिसर ऐरवी निर्मनुष्य असतो. परिसर लहान मोठ्या झुडपांनी वेढलेला आहे. यामुळे कोणी येथे टाळतात. यातील एका झुडपात सोमवारी सकाळी गुडघ्यापासून वेगळा केलेला आणि अर्धवट जळालेला पाय आढळून आला. 

याची माहिती या प्रभागाचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांना दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. अर्धवट जळालेला पाय महिलेच्या असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत घटनास्थळी पोहोचले होते. 

सविस्तर वाचा - आश्‍चर्य... तुकाराम मुंढे यांना अधीक्षक अभियंत्याने पाडले तोंडघशी! 

पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक आणि श्‍वान पथक बोलावले. घटनास्थळी रुग्णालयात वापरले जाणारे हातमोजे आणि काही वस्तू आढळून आले. या महिलेचा खून करून शरीराचे तुकडे केले असावे. ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून टाकले असावे, असा पोलिसांना संशय आहे. 

पोलिसांचा तपास सुरू

झुडपात महिलेच्या शरीराचा जळालेला अवयव मिळाल्याने एकच खळबळ उडाली. गुडघ्यापासून वेगळा केलेला पाय अर्धवट जाळून इथे फेकला होता. या महिलेच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या भागात फेकले असावे, असा संशय पोलिसांना आहे. त्याच दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Partially burnt feet found in Chandrapur Law College area