संततधार पावसाचा मंगळवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. संततधार पावसामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमधील नदी, नाले, ओढे यातील पाणीपातळीत वाढ होऊन ते दुथडी वाहू लागलेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन गावांचा उमरेड शहराशी संपर्क तुटला असल्याचे चित्र दिसत आहे.

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली. संततधार पावसामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमधील नदी, नाले, ओढे यातील पाणीपातळीत वाढ होऊन ते दुथडी वाहू लागलेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन गावांचा उमरेड शहराशी संपर्क तुटला असल्याचे चित्र दिसत आहे. पावसामुळे शेतीकामासोबतच अन्य कामांचाही खोळंबा झाल्याचे दिसते. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेत जाणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागासोबतच शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वर्दळीचा चौक असलेला संत संताजी जगनाडे महाराज चौकातसुद्धा दिवसभर शुकशुकाट दिसला. पाऊस जर नियमित सुरूच राहिला तर शेतीला धोका होऊ शकतो, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. ब्राम्हणी गावालगत असलेल्या उंद्री नदीला पूर आल्यामुळे गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. बुटीबोरी : आज सकाळपासून परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रदीर्घ कालावधीनंतर आलेल्या पावसाने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पावसाचा आनंद लुटण्याकरिता लहान मुले व अनेक नागरिक या पावसात भिजून चिंब झाले. मात्र, शाळकरी विद्यार्थ्यांची चक्क फजिती झाली. शाळा सुटताच त्यांना मुसळधार पावसाचा मारा सहन करावा लागला. पावसाने काही प्रमाणात का होईना उष्णतेच्या लाटेपासून मुक्ती दिली. बळीराजाला या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळेल.  पुरामुळे पुलाच्या कठड्याला कार अडकली असून जीवितहानी झाली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Partly cloudy Tuesday