mpsc
mpscsakal

एमपीएससी उत्तीर्ण, पण मुलाखतीला मुकणार?

अपघातात दोन्ही हातांना दुखापत; लोकनाट्य कलाकाराच्या मुलाचा मृत्यूसोबत संघर्ष

नीलज : लोकनाट्य कलाकाराचा मुलगा नीलेश रमेश बांते (वय २६) आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. मुलाखतीत बाजी मारून आई-वडिलांसोबत गावाचे नाव मोठे करण्याचा आत्मविश्वास त्याला होता. परंतु, अपघातात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली अन जीव वाचला तरी तो मुलाखतीला मुकणार का, अशी चिंता निर्माण झाली आहे.

दसऱ्याच्या दिवशी नीलज येथील सहा मित्र डोंगरगड येथे देवदर्शनासाठी जाण्यास निघाले. परंतु, तिरोडा तालुक्यात सरांडीजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर, चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यापैकी नीलेशला गंभीर दुखापत झाली. यात त्याचे दोन्ही हात निष्क्रिय झाले आहेत. चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. चार दिवसांपासून तो गोंदिया येथील खासगी रुग्णालयात आहे. नीलेश पहिल्यांदा एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. प्रत्येक स्पर्धेत अव्वल येणाऱ्या नीलेशची प्रगती पाहून त्याच्या वडिलांनी तुमसर शहरातील जनता विद्यालयात त्याला पाठवले. दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत तो झळकला. वडिलांच्या आग्रहापोटी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेण्याचा निर्णय त्याने घेतला.

mpsc
थंडीचा मुहूर्त दिवाळीनंतरच; हवामानतज्ज्ञांचा अंदाज

अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयतून त्याने २०१८मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. कॅम्पसमध्ये मिळालेली लठ्ठ पगाराची खासगी कंपनीतील नोकरी सोडून त्याने शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग निवडला. त्यासाठी पुण्यात येऊन छोट्या-मोठ्या ठिकाणी काम करून नीलेशने स्वतःच्या शिक्षणाचा व पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. त्याचबरोबर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची तयारी सुरू केली. दिवसभर अभ्यासिकेत अभ्यास व रात्री कॉल सेंटरमध्ये काम तो करीत होता. २०१९ मध्ये एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणारा तो गावातील पहिला विद्यार्थी ठरला. कोरोनामुळे एमपीएससीच्या मुलाखती मागील दीड वर्षापासून झाल्या नाहीत. आता नोव्हेंबर महिन्यात नीलेशला मुलाखतीकरिता जायचे होते. पण, अपघातात जायबंदी झाल्याने त्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

घरची बेताची परिस्थिती

नीलेशच्या वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच आहे. ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. अंगात असलेला कलेमुळे गावागावात होणाऱ्या जत्रांमधील लोकनाट्यातून ते कला सादर करतात. त्यांनी नीलेशच्या मनात निर्माण केलेल्या जिद्दीच्या बळावरच तो या यशापर्यंत पोचला आहे.

सहा शस्त्रक्रिया; मदतीचा ओघ सुरू

नीलेशच्या हातांना, खांद्यांना व तोंडाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर सहा ते सात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एवढा मोठा खर्च कसा करावा, हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा आहे. गावकरी व त्याचे मित्र या दुःखाच्या वेळी मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांनी विविध माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com