esakal | Video : धुळीच्या रस्त्याने वळविली वाहतूक; अचानक रस्ता बंद केल्याने प्रवासी त्रस्त

बोलून बातमी शोधा

Passengers suffer due to sudden road closure chandrapur district news}

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा-चंद्रपूर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रेल्वे विभागामार्फत डागडुजीचे काम केले जात आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून उड्डाणपुलाला लागून असलेला जुन्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲश पसरली आहे. वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर परिसरात धुळीचे लोट उसळले. अवघ्या दोन ते तीन फुटावरील वाहने दिसणे कठीण झाले. धुळीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Video : धुळीच्या रस्त्याने वळविली वाहतूक; अचानक रस्ता बंद केल्याने प्रवासी त्रस्त
sakal_logo
By
आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा-चंद्रपूर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रेल्वे विभागामार्फत डागडुजीचे काम केले जात आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून उड्डाणपुलाला लागून असलेला जुन्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲश पसरली आहे. वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर परिसरात धुळीचे लोट उसळले. अवघ्या दोन ते तीन फुटावरील वाहने दिसणे कठीण झाले. धुळीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

वळती केलेल्या मार्गावर रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळीच्या नियंत्रणासाठी पाणी शिंपडले नव्हते. त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात 
नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. राजुरा-चंद्रपूर महामार्गावर उड्डाणपुलावरील रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील मार्गावर डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती देऊन उड्डाणपुलावरील वाहतूक जुन्या मार्गाने वळती केली.

जाणून घ्या - संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर

मात्र, या मार्गावर फ्लाय ऍश पसरली असल्यामुळे वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर धुळीचे लोट उसळले. अवघ्या दोन ते तीन फुटावरील वाहनांना दिसत नव्हते. वाहनांची गर्दी असल्यामुळे सर्व परिसर धुळीने झाकला गेला. खुल्या वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सकाळी आठ वाजेपासून उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम व इतर महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांना मार्ग बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाचे अभियंता सिंग यांनी दिली. मात्र, पर्यायी वळती मार्गावरील धुळीचे प्रदूषण होऊ नये या दृष्टीने कुठलीही उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाने घेतलेली नव्हती.

दोन्ही विभागाने आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलली. त्यामुळे नागरिकांना धुळीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागला. नागरिकांचा त्रास बघून माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी उपविभागीय अभियंता बाजारे व रेल्वे विभागाचे अभियंता सिंग यांच्याशी संपर्क साधला. या मार्गावर तत्काळ पाणी शिंपडण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. नागरिकांत संताप व्यक्त झाल्यानंतर रेल्वे विभागाला जाग आली.

जाणून घ्या - अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या अध्यक्षांनी केला मोठा खुलासा

एक-दोन तासांचे काम असेल असे सांगण्यात आले होते
उड्डाणपुलावरील कामकाज करण्याबाबत रेल्वे विभागाने पत्र दिले होते. मात्र, एक-दोन तासांचे काम असेल असे सांगण्यात आले होते. तसेच डायव्हर्शन मार्गावर पाणी स्प्रे करण्याचे काम संबंधित रेल्वे विभागाने करायला हवे होते.
- आकाश बाजारे,
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजुरा

श्वास घेणे कठीण जात होते
मुख्य महामार्ग बंद करून वडती मार्गाने वाहतूक वळविली. फ्लाय ॲश रस्त्यावर असल्यामुळे प्रचंड धुळीचे लोट उसळले. नागरिकांना श्वास घेणे कठीण जात होते. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे महत्त्वाचे होते. रस्त्याची दुरुस्ती करून पाणी शिंपडून वाहतुकीसाठी मार्ग खुला करायला हवा होता.
- अविनाश जाधव
माजी जिल्हा परिषद सदस्य