
काटोल/सावनेर (जि. नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांना उभारी देण्यासाठी पतंजलीचा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी खरेदी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला काटोल येथे केला.
काटोल व सावनेर येथे पोहोचलेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कार्याचा आढवा घेत नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनादेश देण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विविध क्षेत्रात अग्रेसर असल्याने पुढे देशात क्रांती घडवेल. काटोलात औद्योगिक वसाहत प्रगतिपथावर असती, पण आमचे प्रतिनिधी मैदान सोडून गेल्यामुळे कामे अपुरी राहिली. जनता त्यांना माफ करणार नाही. भाजपला जनता त्यांच्या कामाचे बदल्यात जनाधार देऊन सत्तेत परत आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सभेला नगराध्यक्ष वैशाली दिलीप ठाकूर, मोवाडचे नगराध्यक्ष सुरेश खसारे, आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, संजय टेकाडे, अर्चना डेहनकर, प्रतीक्षा मांडवकर, सुरजितसिंग ठाकूर, अविनाश ठाकरे, माजी पं. स. सभापती संदीप सरोदे, माजी जि. प. सभापती उकेश चव्हाण, जितेंद्र तुपकर, डॉ. प्रेरणा बारोकर, ऍड दीपक केणे, विजय महाजन, भीमराव बन्सोड, योगेश चापले उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवीण लोहे, व सहकारी मंडळींनी भाजपात प्रवेश केला. संचालन जितेंद्र तुपकर, आभार दिलीप ठाकरे यांनी केले. प्रा देवीदास कठाणे, किशोर गाढवे, राजू चरडे, सुभाष कोठे, नगरसेवक हेमराज रेवतकर, तानाजी थोटे, प्रशांत श्रीपतवार, मनोज पेंदाम, वनिता रेवतकर, लता कडू, शालिनी बन्सोड, श्वेता डोंगरे, शालिनी महाजन, संगीता हरजाल, माया शेरकर, वैभव विरखरे, लक्ष्मीकांत काकडे यांनी महाजनादेश यात्रेसाठी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.