esakal | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शोधाला पेटंट I Amravati University
sakal

बोलून बातमी शोधा

saint gadgebaba amravati university

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शोधाला पेटंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील यूजीसी- बीएसआर विद्याशाखेचे प्राध्यापक तथा माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्र राय, सहायक प्राध्यापक डॉ. अनिकेत गादे, प्रकल्प सहायक डॉ. स्वप्नील गायकवाड व डॉ. सोनल बिर्ला यांनी जखमा भरून निघण्याच्या उपचारासाठी विकसित केलेले चांदीचे नॅनो कण असलेले डिस्पर्स जेल (सिल्व्हर नॅनोपार्टिकल्स डिस्पर्स जेल) या संशोधनाकरिता पेटेंट मिळाले आहे.

नॅनो टेक्नॉलॉजीतील हे महत्त्वाचे संशोधन असून मानवी जीवनासाठी फार उपयोगाचे ठरणार आहे. एकप्रकारे ते वरदान असणार असून या संशोधनामुळे अमरावती विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे. सिल्व्हर नॅनोपार्टिकल्स डिस्पर्स जेल, या संशोधनाकरिता मिळालेले पेटेंट हे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांनी मंजूर केलेल्या संशोधन प्रकल्पांतर्गत केलेल्या संशोधनकार्याची यशस्वी पावती आहे.

हेही वाचा: नगरसेवकाने तलाठ्यावर उगारली तलवार; तिसऱ्यांदा केला हल्ला

सदर संशोधनासाठी संशोधक प्राध्यापकांनी २०१४ मध्ये पेटेंट फाईल केले होते. पेटेंट कार्यालयाने त्यांच्या पेटेंटला सप्टेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली आहे. संशोधनकर्त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.

संशोधित सिल्व्हर नॅनो जेलची वैशिष्टे

  • संशोधित जेल जखमा भरण्यासाठी उपयोगी.

  • संशोधन सिल्व्हर नॅनो जेलच्या विकासाशी संबंधित.

  • हा जेल साध्या व सुलभपणे विकसित करता येतो.

  • उत्पादनखर्च कमी, परिणामकता अधिक.

  • पर्यावरणपूरक व रोगजंतूंना विरोध करण्यास सक्षम.

  • मल्टिड्रग प्रतिरोधक आहे.

  • दुय्यम बुरशीजन्य संसर्गापासून बचाव करते.

  • चिरा दिल्याने, जळण्यामुळे व अन्य प्रकारे झालेल्या जखमांवरील उपचारात उपयोगी.

loading image
go to top