Leopard Cub: पाथरी येथे शेतात आढळला बिबट्याचा शावक
Leopard Cub Rescue: साकोली तालुक्यातील पाथरी शेतात दोन महिन्यांचा बिबट्याचा शावक आढळला. वनविभागाचे रेस्क्यू पथक शावकाला मादी बिबट्याकडे सोडण्याच्या तयारीत. शेवटी शावक सुरक्षितरीत्या मादी बिबट्याकडे स्वाधीन करण्यात येणार असून शेत परिसरात तातडीने सुरक्षा घालण्यात आली आहे.
साकोली : तालुक्यातील शिवारातील शेतात शनिवारी (ता.६) रोजी सकाळी बिबट्याचा अंदाजे दोन महिनाचा शावक आढळून आला. यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक येथे दाखल झाले असून, शावकला मादी बिबट्याचे स्वाधीन करण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे.