Yavatmal News : पाथरवाडी येथे आदिवासी महिलांचे उपोषण सुरू; प्रशासनाची पाठ

पाथरवाडी ऐवजी जाम नाला प्रकल्पावर जल जीवन मिशनची विहीर घेण्यात यावी, या मागणीसाठी पाथरवाडी येथील आदिवासी महिलांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
पाथरवाडी येथे आदिवासी महिलांचे उपोषण सुरू
पाथरवाडी येथे आदिवासी महिलांचे उपोषण सुरूSakal

पुसद (जि. यवतमाळ) : पाथरवाडी ऐवजी जाम नाला प्रकल्पावर जल जीवन मिशनची विहीर घेण्यात यावी, या मागणीसाठी पाथरवाडी येथील आदिवासी महिलांनी गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी या उपोषणाची दखल न घेता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने महिलांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.

पुसद तालुक्यातील शिरोळा गावाजवळ आदिवासींची पाथरवाडी आहे. या वाडीत पाणीपुरवठ्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा स्त्रोत म्हणून पाथरवाडीच्या छोट्या तलावाजवळ विहीर खोदण्याचे सुचविण्यात आले आहे.

प्रत्यक्षात जाम प्रकल्पात या तलावापेक्षा पंधरा पट पाणी ज्यादा आहे. त्यामुळे जाम प्रकल्पातून शाश्‍वत पाणीपुरवठा होऊ शकतो. तसे न झाल्यास पाथरवाडी पाझर तलावा जवळील विहिरीच्या स्त्रोतवर होणारा खर्च व्यर्थ जाऊ शकतो. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.

परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. कुठे आदिवासी महिलांनी आमरण उपोषण ता. ९ पासून सुरू केले असून पाथरवाडीची मागणी मंजूर झाल्याशिवाय मागे हटणार नाही, इशारा आदिवासी महिलांनी प्रशासनाला दिला आहे.

गावातील आदिवासी महिला प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसल्या. परंतु प्रशासनाच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी या उपोषणाला भेट दिली नाही किंवा या गरीब आदिवासी महिलांची साधी चौकशी सुद्धा केली नाही. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com