Video : दररोज शाळेत जातो हा कबुतर.... काय आहे कारण?

बालकदास मोटघरे
शनिवार, 25 जानेवारी 2020

जखमी अवस्थेत सापडलेले हे पिल्लू बरं झाल्यावर उडून जाईल, असे  जया टाले यांना वाटले होते. मात्र त्याने त्यांची साथ सोडलीच नाही. घरी असतांना तो घरच्या सदस्यासारखा वागतो. घरातील सर्वजण झोपले की तो देखील झोपतो. सकाळी सर्वांसोबत उठतो, बाहेर स्वच्छंद फिरून घरी येतो. टाले मॅडम शाळेला निघाल्या की सोबत जाते, हाच त्याचा दिनक्रम. एकदा तर तो टाले मॅडमसोबत दिवाळीला माहेरी सुद्धा गेला होता.

वरोरा (जि. चंद्रपूर) : अनेक हौशी लोक घरात कबुतर पाळत असल्याचे आपण पाहिले असेल. पण दररोज शाळेत जाणारा कबुतर कधी पाहिला आहे का? नाही नं... मग बघा छायाचित्रात दिसत असलेला हा कबुतर दररोज शाळत जातो. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे.

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील बालाजी कॉन्व्हेट परिसरात पावसाळ्याच्या दिवसात एक कबुतराचे पिल्लू   जखमी अवस्थेत पडून होते. शाळेच्या मुखाध्यापिका जया टाले यांच्या लक्षात येताच त्यानी जखमी कबुतराच्या पिल्लाला मायेने जवळ घेत त्याच्यावर उपचार केला. सुदैवाने त्या पिल्लाचा जीव वाचला. मग काय... तेव्हापासूनच  तो कबुतराचा पिल्लू टाले यांच्या घरचा सदस्य झाला. टाले  मॅडम शाळेत जायला निघाल्या की, तोही त्यांच्यासोबत शाळेत जातो, दिवसभर तो त्यांच्यासोबत शाळेतच वावरत असतो. शाळेत असताना त्याची सर्वात आवडती जागा म्हणजे मुखाध्यापिका जया टाले मॅडम यांची खुर्ची. खुर्चीवर बसून तो जणू मुख्याध्यापक असल्यासारखा मिरवत असतो.

जखमी अवस्थेत सापडलेले हे पिल्लू बरं झाल्यावर उडून जाईल, असे  जया टाले यांना वाटले होते. मात्र त्याने त्यांची साथ सोडलीच नाही. घरी असताना तो घरच्या सदस्यासारखा वागतो. घरातील सर्वजण झोपले की तो देखील झोपतो. सकाळी सर्वांसोबत उठतो, बाहेर स्वच्छंद फिरून घरी येतो. टाले मॅडम शाळेला निघाल्या की सोबत जाते, हाच त्याचा दिनक्रम. एकदा तर तो टाले मॅडमसोबत दिवाळीला माहेरी सुद्धा गेला होता. शाळेतील शिक्षक लीलाधर सर यांनी त्याचे पिजू नाव ठेवले आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षकांमध्ये तो मोकळेपणाने वावरत असतो.

- राज्यात  दारूबंदीचा पोरखेळ : चंद्रपुरातून  हटविण्याच्या हालचाली तर या जिल्ह्यात होणार दारूबंदी...

आपुलकीने काळजी घेतली की तेही तुमच्यावर जीव लावतात
पिजू झाला की उडून जाईल असे वाटले होते. मात्र तो गेला नाही. आता तो आमच्या शाळा आणि घरचा सदस्य झाला आहे. पक्षी व प्राण्यांची प्रेमाने, आपुलकीने काळजी घेतली की तेही तुमच्यावर जीव लावतात .विद्यार्थ्यांनाही पशू पक्षांशी प्रेमाने वागावे अशा संदेश मिळतो.

-जया टाले, मुखाध्यापिका, बालाजी कॉन्व्हेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peagion goes to school regularly