"साहेब जीव गेल्यावर पैसे द्यालं का जी' :  सीसीआय, पणनकडे अडले 696 कोटी 

रूपेश खैरी 
शुक्रवार, 29 मे 2020

राज्यात सीसीआयची कापूस खरेदी पणनच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. सीसीआयने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 56 लाख 25 हजार क्‍विंटल कापूस खरेदी केला आहे. तर लॉकडाउननंतरच्या काळात केवळ साडेआठ लाख क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. 

वर्धा : कापूस खरेदी झाली. कापूस विकलाही. मात्र, शेतकऱ्यांना चुकारे मिळालेच नाही. दोन महिने झाले. आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेवर हा शेतकरी आहे. त्यांच्यासमोर हंगाम उभा आहे. पण, बी-बियाण्यांसाठी पैसा नाही. कापसाचे चुकारेही नाही. साहेब जीव गेल्यावर पैस द्यालं काजी, अशी विनवणी शेतकरी करीत आहे. सरकारकडे त्यांच्या हक्‍काचे 696 कोटी अडले आहेत. 

हे वाचा— 80 टक्के विद्यार्थी लपवितात सायबर गुन्ह्यांची माहिती, वाचा काय आहे प्रकार
 

शेतकरी चांगलाच अडचणीत 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचण कमी होण्याऐवजी त्या वाढतानाच दिसत आहेत. शासनाकडून खरेदीला नसलेली गती या समस्येचा सामना करताना आता चुकाऱ्याकरिताही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. 
राज्यात सध्या कापूस खरेदी करणारी शासकीय यंत्रणा म्हणून सीसीआय आणि कापूस पणन महासंघ कार्यरत आहे. दोन्ही यंत्रणेकडून लॉकडाउननंतर कापूस खरेदी करण्यात येत आहे. या दोन्ही यंत्रणांकडून आतापर्यंत 123 लाख क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे मिळणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना चुकाऱ्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या दोन्ही यंत्रणेकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 693 कोटी रुपये थकले आहेत. 

हे वाचा— नथीचा नखरा किंवा नऊवारी साडीतील फोटो नव्हे तर याचा आहे रूबाब... 

शेकडो क्‍विंटल कापूस घरीच 

खरीप हंगाम तोंडावर आहे. या काळात विकलेल्या शेतमालाचे चुकारे मिळावे असे शेतकऱ्यांना वाटत आहे. या शेतकऱ्यांवर कापसाचे चुकारे अडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे चुकारे अडलेले चुकारे आणि दुसरीकडे घरीच पडून असलेला कापूस आणि तोंडावर आलेला पावसामुळे यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. गाठीला पैसा नसल्याने खरीप हंगाम कसा साधावा अशी शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. 

पणन महासंघाकडे अडले 493 कोटी 

राज्यात पणन महासंघाकडून आतापर्यंत 67 लाख क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. यात लॉकडाउननंतर पणन महासंघाकडून 13 लाख 42 क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. खरेदी करण्यात आलेल्या या खरेदीपोटी पणन महासंघाकडून चुकारे देण्याकरिता यंदा जरा विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. पणन महासंघाकडे कापूस शेतकऱ्यांचे तब्बल 493 कोटी रुपये थकले आहेत. 

सीसीआयची खरेदी 56 लाख क्‍विंटल 

राज्यात सीसीआयची कापूस खरेदी पणनच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. सीसीआयने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 56 लाख 25 हजार क्‍विंटल कापूस खरेदी केला आहे. तर लॉकडाउननंतरच्या काळात केवळ साडेआठ लाख क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. 

सरकारकडे कापूसाचे चुकारे त्वरीत करण्याची मागणी केली. काही दिवसांत हंगामाला सुरुवात होणार आहे. त्याला हंगामात पैसा मिळाला नाही, तर पुढचा हंगाम त्याला उद्‌ध्वस्त करणार आहे. सरकारने त्वरीत चुकारे करावे, अशी मागणी आहे. 
-हुकूमचंद आमधरे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pending 696 crore to CCI, marketing?