esakal | दुर्दैवी! स्वतः:चं घरकूल बांधण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; महागाईमुळे अनेकांनी सोडला विचार

बोलून बातमी शोधा

people are hesitating to build their own house due to increase rates of materials }

गेल्या काही वर्षांत बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सिमेंट, वाळू, विटा आदी साहित्याचे चढते दर यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्नही आवाक्‍याबाहेर गेले आहे. 

vidarbha
दुर्दैवी! स्वतः:चं घरकूल बांधण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; महागाईमुळे अनेकांनी सोडला विचार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

लाखांदूर (जि भंडारा): विटा, वाळू आणि सिमेंटच्या दरवाढी पाठोपाठ आता गिट्टीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे "बजेट' कोलमडून गेले आहे. वाळूचे भाव गेल्या काही वर्षांत दुपटीने वाढले आहेत. विटांच्या दरवाढीचा आलेख चढता आहे, अशातच डिझेल, वीज आणि मजुरीच्या दरवाढीचे कारण समोर करून क्रेशर चालकांनी गिट्टीचे भाव चार हजार रुपये प्रती ब्रासपर्यंत वाढवले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात येऊन देखील घरकुलाच्या बांधकामासाठी हा निधी अपुरा पडू लागला आहे.

गेल्या काही वर्षांत बांधकाम साहित्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सिमेंट, वाळू, विटा आदी साहित्याचे चढते दर यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्नही आवाक्‍याबाहेर गेले आहे. 

हेही वाचा - पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण? दोन दिवसानंतरही मृत अर्भकाच्या मातेचा शोध नाही

वाळूघाटांच्या लिलावात होणारा विलंब, कंत्राटदारांमधील स्पर्धा, बड्या कंत्राटदारांचे हितसंबंध आणि अपुरा वाळूसाठा, याचा एकत्रित परिणाम वाळूच्या दरवाढीत झाला. गेल्या वर्षी 1 हजार रुपये ट्रॅक्‍टर असा वाळूचा दर आता तीन ते साडे तीन हजार रुपयांवर पोहचला आहे. दोन हजार विटांच्या ट्रॅक्‍टरला 15 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

मोठ्या शहरांमध्ये भूखंड घेऊन घर बांधण्याच्या सर्वसामान्यांच्या इच्छापूर्तीचा मार्ग ठप्प झाला असताना आता छोट्या घरकुलांसाठी देखील बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून गरजूंना घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

हेही वाचा - आता कोरोनाचे अहवाल मिळणार वेळेत, आलंय नवीन तंत्रज्ञान

गेल्या काही वर्षांत अनुदानात सातत्याने वाढ होऊन देखील हे अनुदान अपुरे पडू लागले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि गरजू कुटुंबांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पक्‍क्‍या घरांसोबतच शौचालय, स्नानगृह तयार करावे लागते. गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी ही योजना राबवली जात असली, तरी त्यात मुख्य अडचण ही बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ हीच आहे.

संपादन - अथर्व महांकाळ