esakal | पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण? दोन दिवसानंतरही मृत अर्भकाच्या मातेचा शोध नाही
sakal

बोलून बातमी शोधा

पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण? दोन दिवसानंतरही मृत अर्भकाच्या मातेचा शोध नाही

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वॉर्डातील कर्मचाऱ्यांचे बयानही नोंदविण्यात आले आहे. चंद्रपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समक्ष शव विच्छेदनासाठी पाठविले होते.

पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण? दोन दिवसानंतरही मृत अर्भकाच्या मातेचा शोध नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिमूर (जि. चंद्रपूर) : ‘माता न तू वैरिणी’ अशी म्हण आहे. एका मातेने सात महिन्यांच्या भ्रूणाला जन्म देताच मारून फेकून दिले. पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण? याची चर्चा आता होत आहे. ही घटना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वॉर्ड क्रमांक एकच्या शौचलयालतील आहे.

गजबजलेल्या आणि जिथे आरोग्य कर्मचारींचा स्टाफ तैनात असतो अशा वॉर्डमधील शौचालयात सात महिन्यांचे मृत भ्रूण (बालिका) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. ते बाळ जन्माला आल्यानंतर मारून टाकले काय?, कुमारी मातेचे बाळ असावे?, अन्यथा कुमारी मातेचा अवैध गर्भपात केला गेला असावा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अधिक वाचा - खुशखबर! सोनं घ्या सोनं; भाव झाले कमी; चांदी शौकिनांचीही होणार चांदी

या घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस तपास करीत असून, पोष्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा व आणि बयान नोंदविणे सुरू आहे. दुसऱ्या दिवशीही मातेचा सुगावा लागला नसल्याने त्या बाळाच्या आईचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृत भ्रूण आढळून आल्याने खळबळ माजली असली तरी नेमके ते बाळ कोणाचे? आणि शौचालयात का फेकण्यात आले? याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वॉर्डातील कर्मचाऱ्यांचे बयानही नोंदविण्यात आले आहे. चंद्रपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या समक्ष शव विच्छेदनासाठी पाठविले होते. अहवाल प्राप्त न झाल्याने या घटणे मागील रहस्य कायम आहे. नेमके पोलिस तपासात काय उघड होते यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संबंधित कर्मचारी-अधिकारी यांचे बयान नोंदविणे सुरू असले तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट यावर सर्व अवलंबून आहे.

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना 

कुठलीही नोंद नाही

ते बाळ जिवंत होते की मृतावस्थेत जन्माला आले आणि कोणाचे याची माहिती रुग्णालयात असायला पाहिजे होती. मात्र, याची कुठलीही नोंद नाही. जेव्हा सफाई कामगार शौचालय सफाईसाठी गेले असता प्रकार उघडकीस आला. त्यामुळे फिर्यादी राजेश सुब्बाराव शेट्टी या सफाई कामगाराच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध चिमूर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसानंतरही मृत अर्भकाची माता कोण याचा शोध पोलिस लावू शकलेले नाहीत.