esakal | सावधान! ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वाढण्याची भीती; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन  
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614082929964,"A":[{"A?":"I","A":22.403374992578392,"B":804.7619062367755,"D":143.69381843814517,"C":44.15319148372099,"a":{"B":{"A":{"A":"MAEWkbeQURQ","B":1},"

विदर्भातील काही जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन ऍक्‍शन मोडमध्ये आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिग ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र,

सावधान! ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वाढण्याची भीती; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन  

sakal_logo
By
महेश येडे

रावणवाडी (जि. गोंदिया) ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी ग्रामीण भागांत खबरदारी घेतली जात नाही. नाकातोंडावर मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा बहुतांश व्यक्ती अंमल करताना दिसत नाहीत. परिणामी, संक्रमणाधाचा धोका वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - 'तिला' बघून पाणावले कुटुंबियांचे डोळे: तब्बल ६ महिन्यांपासून बेपत्ता महिलेची घरवापसी;...

विदर्भातील काही जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन ऍक्‍शन मोडमध्ये आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिग ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. मात्र, ग्रामीण भागांत बहुतांश नागरिकांना या त्रिसूत्रीचा विसर पडला आहे. विना मास्क नागरिक रस्त्यावर येत आहेत. ही संक्रमणाकरिता धोक्‍याची घंटा आहे.

गोंदिया तालुक्‍यातील काटी, कामठा, रावणवाडी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. तरीदेखील नागरिकांनी मनावर घेतल्याचे दिसत नाही. शाळा, महाविद्यालयांतदेखील गर्दी वाढली आहे. आठवडी बाजारात विना मास्क ग्राहक व विक्रेते आढळून येत असून, सोशल डिस्टन्सिंगदेखील त्यांच्यात नसते. 

हेही वाचा - कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह? जिल्हापरिषद सदस्याला चक्क लॅबनं दिली ऑफर 

उल्लेखनीय म्हणजे, काटी, कामठा, रावणवाडी ही तिन्ही गावे छत्तीसगड, मध्य प्रदेश सीमेला लागून असून, या राज्यातील नागरिकांचेही आवागमन सुरू आहे. संबंधित विभागाने विवाह समारंभाकरिता 50, अंत्यसंस्काराकरिता 20 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येऊ नये, असे फर्मान सोडले आहे. परंतु, याचेही पालन होताना दिसत नाही. दरम्यान, प्रशासनाने ग्रामीण भागांत कठोर कारवाईचे पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ