

अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासून बाहेर गावावरुन जिल्ह्यात 19 हजार 963 प्रवाशी परतले आहेत. त्यापैकी 19 हजार 272 प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांनी कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक असलेला 14 दिवसांचा अलगीकरणाचा (क्वारंटाईन) कालावधी पूर्ण केला आहे. परंतु अद्याप 691 प्रवाशांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण होणे बाकी आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते, परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले, त्या ठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
परिणामी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील गुरुवारपर्यंत (ता. 16) परतलेल्या 19 हजार 963 प्रवाशांपैकी 19 हजार 271 प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. संबंधितांपैकी काही नागरिकांना पुढीत तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर सुद्धा करण्यात आले आहे. परतलेल्या 19 हजार 272 नागरिकांनी अलगीकरणाचा कालावधी (क्वारंटाईन) पूर्ण केला आहे.
असे आहेत अलगीकरण पूर्ण झालेले प्रवाशी
अकोला तालुक्यातील 3 हजार 855, मूर्तिजापूर 1 हजार 974, बार्शीटाकळी 3 हजार 664, पातूर 3 हजार 553, बाळापूर 2 हजार 390, तेल्हारा 1 हजार 814, अकोट 3 हजार 22 अशा एकूण 19 हजार 272 प्रवाशांनी 14 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.