खड्डे बुजवा किंवा आम्हाला गाडा; वर्धा जिल्ह्यातील भिडी-पुलगाव रस्त्यासाठी दफन आंदोलन

People done Dafan protest for building new roads in Wardha
People done Dafan protest for building new roads in Wardha

देवळी (जि. वर्धा): येथून पुलगावकडे जाणारा रस्ता पुरता खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी गावकऱ्यांनी बांधकाम विभागाला अनेकवार निवेदने दिली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे संतापलेल्या युवा सघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह गावकऱ्यांनी खड्डे बुजवा किंवा आम्हाला गाडा असे म्हणत रस्त्यावर दफन आंदोलन केले.

या दफन आंदोलनात युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी आपले शरीर पूर्ण दफन केले. यावेळी येथे सात ते सात गावातील सरपंच व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस दलाचे धर्मपाल मानकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपार पर्यंत कोणीही शासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी येथे आले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांत त्यांच्या विरोधात चांगला संताप पसरला आहे.

या दफन आंदोलनात किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, राहुल कामडी, वैभव नगराळे, प्रशांत चहारे, भूषण कडू, भिडीचे सरपंच सचिन बिरे, लोणीचे सरपंच वैभव शामकुवर, तळणीचे संतोष मसराम, वासुदेव दिघाडे, सुनील चोरे, नरेश जगनाडे, मोहन रोकडे, अरुण काळमोरे, राजीव गांधी, पुरुषोत्तम खेरडे, प्रमोद चरडे, चंफत चरडे, धनराज वाघाडे, नीलेश खेत्री, कवडू परचाके, प्रवीण काळे, संदीप इंगोले, अरुण धारणे, रामभाऊ कामडी, प्रशांत गवळी यांचा सहभाग होता.

दोन वर्षांपूर्वी पूल गेला वाहून

भिडी गावापासून या रस्त्यावर अर्ध्या किमी अंतरावर असलेला पूल वाहून गेला. याला दोन वर्षाचा कार्यकाळ झाला. येथे मोठे भगदाड पडले असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. परिसरातील सहा ते सात गावांकरिता हा रस्ता महत्त्वाचा ठरत आहे. रस्त्याची दैन्यावस्था झाल्याने या मार्गावरून सतत सुरू असलेली पुलगाव-भिडी बससेवाही रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाला माहिती देऊनही त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नसल्याने येथे दफन आंदोलन करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com