
लसीसाठी पहाटेपासून नागरिकांच्या रांगा, पण पुन्हा पदरी निराशा
अमरावती : डोळ्यांतील झोप मोडून पाण्याच्या बाटल्या व बिस्किटांची पाकिटे घेऊन रांगेत उभी असलेली ज्येष्ठ मंडळी, उन्हापासून बचावासाठी स्कार्फ गुंडाळलेल्या महिला, मिळेल तशा सावलीने स्वतःला संरक्षित करण्याची धडपड अमरावतीकर सध्या अनुभवत आहेत. मंगळवारी (ता.11) पहाटे चारपासूनच बडनेरा येथील केंद्रांवर लशींसाठी (corona vaccination) नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, मर्यादित डोस (limited dose of corona vaccine) असल्याने अनेकांना निराश होऊन परतावे लागले. लशीसाठी अमरावतीकरांची ही केविलवाणी धडपड मागील 15 दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या संचारबंदी (amravati lockdown) सुरू असतानाही लसीकरण केंद्रे (vaccination center amravati) मात्र गर्दीने तुडुंब भरलेली आहेत. (people facing problem for corona vaccination in amravati)
हेही वाचा: कट्टर विरोधकांनाही गडकरींनी पाडली भूरळ, नाना पटोलेंच्या सोशल मीडिया ग्रुपवरही कौतुक
केवळ बडनेराच नव्हे तर शहरातील इर्विन परिसरातील परिचारिका महाविद्यालय, बडनेरा मोदी हॉस्पिटल, राजापेठ परिसरातील तखतमल महाविद्यालय व हॉस्पिटल तसेच जिल्ह्यातील अन्य केंद्रांवरसुद्धा हीच परिस्थिती होती. अवघ्या काही वेळातच लशी संपल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर नागरिकांचा पारा चांगलाच भडकला. कोव्हॅक्सिनचे काही डोस अमरावतीला आल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर संबंधित केंद्रांवर पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, नेमके किती डोस आलेत? याची माहिती नागरिकांना दिली जात नव्हती. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. विशेष म्हणजे बहुतांश नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आलेले होते. मागील 20 दिवसांपासून कोव्हॅक्सिनचा साठा अमरावतीला आलाच नव्हता. मात्र, मंगळवारी तो प्राप्त झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली.
सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा -
कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेले सोशल डिस्टन्सिंग कुठे नावालाही दिसत नव्हते. कर्मचाऱ्यांकडून तशी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. मिळेल त्या जागेत नागरिक विशेषतः ज्येष्ठ मंडळी आपला नंबर येण्याच्या प्रतीक्षेत दिसून आले.
लसीकरणासंदर्भात प्रशासनाकडून करण्यात आलेले नियोजन पूर्णपणे फसले आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन लशींचा पुरेशा साठा उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला पाहिजे.-शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ते, भाजप.
Web Title: People Facing Problem For Corona Vaccination In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..