
लसीकरणाच्या 'स्लॉट बुकींग'साठी तारेवरची कसरत, काही सेकंदातच संपतेय नोंदणी
यवतमाळ : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (corona vaccination) एक मे म्हणजे महाराष्ट्रदिनापसून सुरू झाले आहे. मात्र, नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोविनवर ऑनलाइन नोंदणीनंतर (online registration) स्लॉट बुकिंगसाठी (slot booking on cowin) तासन्तास नोंदणी होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. असे करूनही अवघ्या काही सेकंदांत नोंदणी "क्लोज' होत आहे. विशेष म्हणजे नोंदणी सुरू होण्याची ठरावीक वेळ नसल्याने नागरिक दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत मोबाईल किंवा संगणकासमोर बसून राहत आहेत. (people facing problems while booking slot on cowin portal for corona vaccination)
हेही वाचा: कट्टर विरोधकांनाही गडकरींनी पाडली भूरळ, नाना पटोलेंच्या सोशल मीडिया ग्रुपवरही कौतुक
अठरा ते 44 वयोगटातील नागरिकांना लस घेण्यापूर्वी कोविन ऍप किंवा पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन वेळ घेतल्यानंतरच लसीकरण केले जात आहे. मात्र, नोंदणी करताना अनेकांच्या नाकीनऊ येत आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचा अल्पसाठा देण्यात आला. त्यातूनही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लसी दिल्या जात आहेत. त्यातुलनेत नोंदणी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. परिणामी, दिवसभरापासून अनेकजण नोंदणीसाठी प्रयत्न करीत असतात. नोंदणीसाठी काही वेळेपर्यंतच साइड ओपन असते. अवघ्या काही सेकंदांत नोंदणी "क्लोज' होत आहे. त्यामुळे अनेकजण त्रासले आहेत. वेळेसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांनीही वेळ निश्चित नसल्याचे सांगितले.
हेही वाचा: दिल्लीपासून गल्लीपर्यंत लस वाटपात भेदभाव; विशिष्ट केंद्राला सर्वाधिक पुरवठा
अनेक केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने अनेक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत नाही. नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. अनेक केंद्रांवर हा नित्याचाच प्रकार झाला आहे. परिणामी अजूनही अनेकांना दुसरा डोस मिळत नाहीये. त्यामुळे यासंदर्भात नियोजन होणे गरजेचे आहे. नागरिकांनी लसीचे डोस वाढवून देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील लसीकरण बंद? -
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी जवळपास 40 हजार लशींचे डोस आलेले होते. त्यातून जिल्ह्यातील सर्व केंद्रांना लस पुरविण्यात आली. त्यातून नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी (ता.11) लसी डोस जवळपास संपले आहेत. ज्या केंद्रांवर लस उपलब्ध आहे. त्या ठिकाणीच लसीकरण सुरू असून, अनेक केंद्रे बंद झालेली आहेत. लस उपलब्ध नसल्याने दोन दिवसांनंतर लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
Web Title: People Facing Problems While Booking Slot On Cowin Portal For Corona Vaccination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..